खलिस्तानी दहशतवादी (Khalistani Terrorists) गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) याच्या हत्येच्या कटात भारतीय अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाने केला होता. त्यानंतर अमेरिकेनेही भारतावर आरोप केले होते. कॅनडाला (Canada) तर भारताने कठोर प्रत्युत्तर दिले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अमेरिकेलाही खडसावले आहे. अमेरिकेकडे (America) याबाबत काही पुरावे असतील, तर त्यांनी ते सादर करावेत, असे पंतप्रधान मोदी यांनी खडसावले आहे. पंतप्रधान मोदी यांनी फायनान्शिअल टाईम्सला मुलाखत दिली. त्या वेळी त्यांनी अमेरिकेने भारतावर केलेल्या आरोपांवर भाष्य केले.
(हेही वाचा – Maharashtra Sadan Scam : छगन भुजबळ पुन्हा अडचणीत येणार ?; ३ आरोपी माफीचे साक्षीदार होणार)
अमेरिकेचे भारतावर आरोप
अमेरिकेने अलीकडेच पन्नूच्या हत्येच्या कटात भारतीय अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. या कटात एका भारतीय अधिकाऱ्याचा हात असल्याचे बायडेन (Joe Biden) प्रशासनाने म्हटले होते. अमेरिकेच्या या आरोपांनंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (Indian Ministry of External Affairs) एक समिती स्थापन केली. ही समिती अमेरिकेचे दावे आणि पुरावे तपासणार आहे.
कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी कायमच बांधिलकी
अशा काही घटनांमुळे भारत (India) आणि अमेरिका (America) यांच्यातील संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले, “जर कोणी मला याबाबत काही पुरावे दिले, तर आम्ही त्याचा नक्कीच विचार करू. आपल्या नागरिकांपैकी कोणी काही चांगले-वाईट केले असेल, तर त्याचा विचार करू. कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी आमची कायमच बांधिलकी आहे. पाश्चात्य देशांनी फुटीरतावादी घटकांना प्रोत्साहन देऊ नये. भारताने 2020 मध्ये गुरपतवंत सिंह पन्नू (Gurpatwant Singh Pannu) याला दहशतवादी घोषित केले आहे.”
(हेही वाचा – IPL 2024 Auction : समीर रिझवीच्या डोळ्यात पाणी तराळलं जेव्हा त्याची किंमत ८ कोटी रुपयांच्या वर गेली)
अमेरिकेच्या विधी विभागाने २९ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, भारतीय वंशाच्या निखिल गुप्ता याने न्यूयॉर्कमध्ये खलिस्तानी दहशतवादी (Khalistani Terrorists) पन्नूच्या हत्येचा कट रचला होता. गुप्ता यांना भारतीय अधिकाऱ्यांकडून सूचना मिळाल्या होत्या.
खलिस्तानी दहशतवादी (Khalistani Terrorists) पन्नू 2019 पासून एनआयएच्या रडारवर आहे. परदेशात राहून पन्नू सातत्याने भारतविरोधी कारवाया करत आहे. याशिवाय भारतात वेगळे खलिस्तान राज्य निर्माण करण्यासाठी तरुणांना भडकवल्याचा आरोप त्याच्यावर होता. (PM Modi On America Allegations)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community