छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५०वा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार किल्ले रायगडावर दिमाखात साजरा होत आहे. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित आहेत. ढोलताशकांच्या वादनाने संपूर्ण किल्ले रायगड दुमदुमून गेला आहे. काही वेळांपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची शिवरायांच्या चांदीच्या मुर्तीचा दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच शपथ घेऊन शिवरायांची आरती देखील करण्यात आली. एकबाजूला हा सोहळा रायगडावर सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळ्यास मराठीतून शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठीतून म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी असलेल्या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील माझ्या बंधू भगिनींना माझे कोटी कोटी वंदन.’
Chhatrapati Shivaji Maharaj is a beacon of courage and bravery. His ideals are a source of great inspiration. https://t.co/eQZgsyTMm4
— Narendra Modi (@narendramodi) June 2, 2023
पुढे मोदी म्हणाले की, आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिवस आपल्या सर्वांसाठी नवीन चेतना, नवी ऊर्जा घेऊन आला आहे. मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ३५० वर्षांपूर्वी त्या कालखंडातील एक अद्भूत आणि एक विशिष्ट अध्याय आहे. इतिहास त्या अध्यायतून घडला स्वराज्य, सुशासन आणि समृद्धीचे महान गाथा आपल्याला आजही प्रेरित करते. राष्ट्रकल्याण आणि लोककल्याण हे त्यांच्या शासनव्यवस्थेचे मूळ तत्वे राहिले आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन करतो. आज स्वराज्याची पहिली राजधानी रायगड किल्ल्याच्या प्रांगणात राज्याभिषेक सोहळ्याचे दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या दिवस महोत्सव स्वरुपात साजरा केला जात आहे. संपूर्ण वर्षभर अशाप्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्रात होणार आहे. यासाठी मी महाराष्ट्र सरकारला शुभेच्छा देतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community