PM Narendra Modi १६ फेब्रुवारीला ‘भारत टेक्स २०२५’ मध्ये होणार सहभागी

36
PM Narendra Modi १६ फेब्रुवारीला 'भारत टेक्स २०२५' मध्ये होणार सहभागी
PM Narendra Modi १६ फेब्रुवारीला 'भारत टेक्स २०२५' मध्ये होणार सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता नवी दिल्ली (New Delhi) येथील भारत मंडपम (Bharat Mandapam) येथे होणाऱ्या भारत टेक्स २०२५ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या प्रसंगी ते उपस्थितांशी संवाद देखील साधतील. भारत मंडपम (Bharat Mandapam) येथे दिनांक १४ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित भारत टेक्स २०२५ (Bharat Tex 2025) हा भव्य जागतिक कार्यक्रम अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण हा कार्यक्रम वस्त्रोद्योगातील कच्च्या मालापासून विक्रीसाठी तयार उत्पादनांपर्यंतच्या संपूर्ण मूल्य साखळीला एका छत्राखाली आणेल. (PM Narendra Modi)

( हेही वाचा : Scorpio Car Accident : एका व्यक्तीचं कार शिकणं दुसऱ्याच्या जीवावर बेतलं ; Video Viral)

भारत टेक्स मंच (Bharat Tex 2025) हा वस्त्रोद्योगातील सर्वात मोठा आणि सर्वात व्यापक कार्यक्रम असून त्यामध्ये दोन वेगवेगळ्या कार्यक्रमस्थळांवरील प्रचंड मोठ्या प्रदर्शनांचा समावेश असून तेथे वस्त्रोद्योगाच्या संपूर्ण परिसंस्थेचे दर्शन घडेल. यामध्ये ७० हून अधिक परिषद सत्रे, गोलमेज बैठका, गट चर्चा तसेच मास्टर क्लासेस सारख्या जागतिक पातळीवरील परिषदेचा देखील समावेश असेल. तसेच कार्यक्रमस्थळी विशेष नवोन्मेष आणि स्टार्ट अप दालने असलेले प्रदर्शन देखील मांडण्यात येणार आहे.प्रमुख गुंतवणूकदारांच्या माध्यमातून स्टार्ट अप उद्योगांना वित्तपुरवठ्याच्या संधी उपलब्ध करून देणारे हॅकेथॉन्स आधारित स्टार्ट अप पिच फेस्ट आणि नवोन्मेष फेस्ट, टेक टँक्स आणि डिझाईन विषयक स्पर्धांचा देखील या कार्यक्रमात समावेश असेल.(PM Narendra Modi)

इतर अनेक अभ्यागतांसह जगभरातील १२० देशांतून आलेले धोरणकर्ते आणि जागतिक उद्योगांचे प्रमुख, ५००० हून अधिक प्रदर्शक, ६००० आंतरराष्ट्रीय खरेदीदार या भारत टेक्स २०२५ (Bharat Tex 2025) मध्ये सहभागी होतील. आंतरराष्ट्रीय वस्त्र निर्माता महासंघ (आयटीएमएफ), आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती (आयसीएसी), युराटेक्स, वस्त्र विनिमय संघ, यु एस फॅशन उद्योग संघटना (US Fashion Industry Association) (युएसएफआयए) यांसारख्या आघाडीच्या २५ हून अधिक जागतिक वस्त्रोद्योग संस्था आणि संघटनांसह इतर अनेक संबंधित संस्था देखील या कार्यक्रमात भाग घेतील. (PM Narendra Modi)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.