National Sports Day 2022: “भारतभर खेळांची लोकप्रियता वाढत राहिली पाहिजे”

176

राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रीडापटूंना राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. यासंदर्भात पंतप्रधानांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

(हेही वाचा – दिवाळीत होणार जिओ 5G चा धमाका, मुकेश अंबानींची मोठी घोषणा)

ट्वीटरद्वारे पंतप्रधान म्हणाले की, राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा आणि मेजर ध्यानचंदजी यांना जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच पंतप्रधान म्हणाले की, खेळासाठी अलीकडची वर्षे उत्तम राहिली आहेत हा कल कायम राहू दे. भारतभर खेळांची लोकप्रियता वाढत राहिली पाहिजे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जात आहे. या दिवशी लोकांना त्यांचा आवडता खेळ खेळण्यासाठी आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी खेळाची सवय लावण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. या दिवशी देशाचे राष्ट्रपती राजीव गांधी नामांकित व्यक्तींना खेलरत्न, अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कार यांसारखे पुरस्कार देतात.

कोण होते मेजर ध्यानचंद?

  • हा दिवस मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली म्हणून साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हटले जाते.
  • त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्यातील एका राजपूत कुटुंबात झाला. हॉकीचा महान खेळाडू म्हणून त्यांची आठवण केली जाते.
  • तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकी संघाचे सदस्य होते. त्यांनी 1928, 1932 आणि 1936 च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदके जिंकली.
  • देशासाठी 185 सामने खेळताना त्यांनी भारतासाठी 570 गोल केले. भारत सरकारने 1956 मध्ये मेजर ध्यानचंद यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण देऊन सन्मानित केले होते.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.