सरन्यायाधीशांच्या घरी गणपतीला गेल्याप्रकरणी होणाऱ्या टिकेवर PM Modi यांनी सोडले मौन; म्हणाले…

मी सरन्यायाधीशांच्या घरी गणेश पूजेत सहभागी झालो, म्हणून काँग्रेस आणि त्यांच्या इको सिस्टीममधील लोकांना त्रास व्हायला लागला. समाजात फूट पाडणाऱ्यांना गणेश उत्सवाचीही अडचण आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

242

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या घरी श्री गणेशाच्या दर्शनासाठी गेले. त्यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून चौफेर टीका होऊ लागली. अखेर या टीकेला पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी, 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी उत्तर दिले.

द्वेषपूर्ण विचारसरणी समाजात विष पसरवणारी 

आजही समाजात फूट पाडणाऱ्या आणि समाज फोडण्यात गुंतलेल्या सत्तेच्या भुकेल्या लोकांना गणेश पूजनात अडचणी आहेत. मी सरन्यायाधीशांच्या घरी गणेश पूजेत सहभागी झालो, म्हणून काँग्रेस आणि त्यांच्या इको सिस्टीममधील लोकांना त्रास व्हायला लागला. समाजात फूट पाडणाऱ्यांना गणेश उत्सवाचीही अडचण आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने मोठा गुन्हा केला. या लोकांनी गणपतीची मूर्तीची तुरुंगात ठेवली. त्या चित्रांनी संपूर्ण देश व्यथित झाला होता. ही द्वेषपूर्ण विचारसरणी समाजात विष पसरवणारी आहे. हे आपल्या देशासाठी अत्यंत घातक आहे. या द्वेषपूर्ण विचारसरणीला आळा घालणे गरजेचे आहे. अशा शक्तींना आपण पुढे जाऊ देऊ नये, असेही पंतप्रधान मोदी (PM Modi) म्हणाले.

(हेही वाचा ‘सार्वजनिक कार्यक्रमात फक्त 5 तास सहभागी, 10 दिवस परदेशात Rahul Gandhi यांनी काय केलं?’ भाजपाच्या नेत्यांनी उपस्थित केला प्रश्न)

आपल्या देशासाठी गणेश उत्सव हा केवळ श्रद्धेचा उत्सव नाही. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात गणेशोत्सवाचा मोठा वाटा आहे. इंग्रज देशाचे तुकडे पाडण्यात व्यस्त होते, जाती-धर्माच्या नावावर देशात फूट पाडली जात होती, तेव्हा गणेशोत्सवाने लोकांना एकत्र बांधून ठेवम्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, असेही पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी नमूद केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.