PM Narendra Modi : आयुर्वेदाला पाठबळ देणे हे व्होकल फॉर लोकल असण्याचे एक ज्वलंत उदाहरण

123

आयुर्वेदाला पाठबळ देणे हे व्होकल फॉर लोकल असण्याचे एक ज्वलंत उदाहरण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या प्राचीन ज्ञानाची आधुनिकतेशी सांगड घालणाऱ्या आणि आयुर्वेदाला जागतिक स्तरावर नव्या उंचीवर नेणाऱ्या नवोन्मेषक आणि अभ्यासकांचेही मोदी यांनी कौतुक केले आहे. (PM Narendra Modi)

पंतप्रधानांनी X वर ‘हे’ केले पोस्ट 

”धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर आपण आयुर्वेद दिन देखील साजरा करतो. या प्राचीन ज्ञानाची आधुनिकतेशी सांगड घालणार्‍या, आयुर्वेदाला जागतिक स्तरावर नवीन उंचीवर नेणार्‍या नवोन्मेषकांना आणि अभ्यासकांना मानवंदना देण्याचा हा दिवस आहे. अनोख्या संशोधनांपासून सर्जनशील स्टार्टअप्सपर्यंत, आयुर्वेद निरामयतेचे नवीन मार्ग खुले करत आहे. आयुर्वेदाला पाठबळ देणे हे व्होकल फॉर लोकल असण्याचे एक ज्वलंत उदाहरण आहे”

(हेही वाचा : Mumbai Fire : विलेपार्लेतील इमारतीला आग, एकाच मृत्यू)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.