PM Modi : पॅसिफिक देशांशी भारताचे संबंध सुधारण्यासाठी मोदींचे प्रयत्न

पंतप्रधान म्हणाले, 'कोरोना लसीद्वारे भारताने सर्व सहकारी मित्रांना मदत केली. भारतासाठी, पॅसिफिकमधील बेटे हे छोटे बेटांचे देश नसून मोठे सागरी देश आहेत.

159

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांसह पॅसिफिक देशांशी भारताचे संबंध सुधारण्यासाठी तयार करण्यात आलेल्या FIPIC म्हणजेच फोरम फॉर इंडिया पॅसिफिक आयलंड को-ऑपरेशनमध्ये सहभागी झाले. दोन्ही देश एकत्रितपणे याचे आयोजन करत आहेत.

शिखर परिषदेचे उद्घाटन करताना पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारेप म्हणाले की, भारत हा ग्लोबल साऊथचा म्हणजेच विकसनशील आणि गरीब देशांचा नेता आहे. विकसित देशांच्या पॉवर प्लेचे आपण सगळेच बळी आहोत. मारापे यांच्यानंतर पीएम मोदींनीही विकसित देशांचे नाव न घेता निशाणा साधला. ते म्हणाले, ‘कोरोनाचा सर्वात जास्त परिणाम ग्लोबल साउथवर म्हणजेच जगातील विकसनशील आणि गरीब देशांवर झाला आहे. हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती, भूक आणि दारिद्य ही आधीच अनेक आव्हाने होती. आता नवीन समस्या निर्माण होत आहेत. पीएम मोदी म्हणाले, ‘आम्ही या काळात ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते संकटकाळात आमच्यासोबत उभे राहिले नाहीत.’ कठीण काळात भारत पॅसिफिक बेटांवरील देशांच्या पाठीशी उभा राहिला. पंतप्रधान म्हणाले, ‘कोरोना लसीद्वारे भारताने सर्व सहकारी मित्रांना मदत केली. भारतासाठी, पॅसिफिकमधील बेटे हे छोटे बेटांचे देश नसून मोठे सागरी देश आहेत.

(हेही वाचा Delhi High Court : पंतप्रधान मोदींची बदनामी केल्याप्रकरणी BBC विरोधात समन्स जारी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.