पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने असलेल्या महाविद्यालयाचे भूमिपूजन शनिवारी (४ जानेवारी) दिल्ली मध्ये करण्यात आले. याप्रसंगी झोपडपट्टीवासीयांना देखील घराची चावी देण्यात आली. तसेच पंतप्रधान मोदींनी नजफगढमधील रोशनपुरा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाची पायाभरणीही केली.
(हेही वाचा- Local Update: मुंबईकरांचं टेन्शन वाढणार; रविवारी ‘तिन्ही’ मार्गावर Mega Block)
पंतप्रधानांनी जेलर वाला बाग येथील झोपडपट्टीवासीयांना फ्लॅटच्या चाव्या दिल्या. गरिबांसाठी 1675 सदनिका बांधण्यात आल्या आहेत. या फ्लॅट्सना स्वाभिमान अपार्टमेंट्स असे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी दक्षिण दिल्लीतील नौरोजी नगरमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि सरोजिनी नगरमधील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी टाईप-2 क्वार्टरचे उद्घाटन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीकरांना नवीन वर्षाची मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान मोदींनी दिल्लीत ४५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. नौरोजी नगरमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि सरोजिनी नगरमधील GPRA टाइप-II क्वार्टर या दोन शहरी पुनर्विकास प्रकल्पांचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. याशिवाय पंतप्रधान मोदींनी नजफगढमधील रोशनपुरा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाची पायाभरणीही केली. एवढेच नाही तर, पंतप्रधानांनी दिल्लीत राहणाऱ्या झोपडपट्टीवासीयांचे जीवन सुधारण्यासाठी त्यांच्या स्वप्नांच्या चाव्या सुपूर्द केल्या. पंतप्रधानांनी दिल्लीतील अशोक विहार येथे स्वाभिमान अपार्टमेंटचे उद्घाटन केले.
नजफगडमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाची पायाभरणी पंतप्रधान मोदींनी केली. द्वारका येथील सीबीएसईच्या नवीन इमारतीचे उद्घाटनही त्यांनी केले.
(हेही वाचा- Maharashtra Weather : थंडी परतली! राज्यात पुढील तीन दिवस ‘असे’ असेल हवामान)
2025 मध्ये आमची भूमिका अधिक मजबूत होईल : पंतप्रधान मोदी
पीएम मोदी म्हणाले, हे वर्ष भारताला एक मोठे उत्पादन केंद्र बनवण्याचे वर्ष असेल. 2025 मध्ये आमची भूमिका अधिक मजबूत असेल. तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेकडे आपण वाटचाल करत आहोत. ज्या योजनांची आज पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले त्यात गरिबांसाठी घरांचाही समावेश आहे. मी सर्व बंधू, भगिनी आणि मातांचे अभिनंदन करतो. आता झोपडपट्टीऐवजी त्यांचे स्वतःचे घर असेल. ज्यांना हे घर मिळाले आहे, त्यांच्या स्वाभिमानाचे ते घर आहे. मी तुमच्या आनंदाच्या उत्सवाचा एक भाग बनण्यासाठी आलो आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांनी दिल्लीच्या जनतेला दिलेली भेट खूप महत्त्वाची आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community