PM Modi Wadhvan Port Bhoomipujan: शिवरायांच्या चरणी डोकं ठेवून माफी मागतो…

274
PM Modi Wadhvan Port Bhoomipujan: शिवरायांच्या चरणी डोकं ठेवून माफी मागतो...
PM Modi Wadhvan Port Bhoomipujan: शिवरायांच्या चरणी डोकं ठेवून माफी मागतो...

केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी असलेल्या वाढवण बंदर (Vadhavan Port) प्रकल्पाचे भूमिपूजन शुक्रवार (३० ऑगस्ट) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाले. यावेळी मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळ्या संदर्भात “छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे मी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो”, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. (PM Modi Wadhvan Port Bhoomipujan)

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी राज्यातील महायुती सरकारवर टीकेची झोड उठली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाढवण येथे यासंबंधी जाहीर माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. “मी शिवरायांच्या पायावर डोक ठेवून माफी मागतो”, असे म्हणत राजकोट किल्ल्यावरील शिवरायाच्या पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली. पंतप्रधान झाल्यावर मी पहिल्यांदा शिवरायांचे आशीर्वाद घेतले. ज्यांना पश्चताप होत नाही आशामधले आम्ही नाही. “ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिव्या घातल्या त्यांनी माफी मागितली नाही. सावरकरांबद्दल वाईट बोलणाऱ्यांनी माफी मागितली का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला. (PM Modi Wadhvan Port Bhoomipujan)

(हेही वाचा – University of Southampton : पहिले परदेशी विद्यापीठ गुरुग्राम मध्ये सुरु होणार, २०२५ मध्ये अभ्यासक्रमांना सुरुवात)

वाढवण बंदरामुळे पुढील ५० वर्षे महाराष्ट्र नंबर १ वर राहील

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) म्हणाले की, आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे. आपण JNPT बंदरापेक्षा (JNPT Port) ३ पट मोठे बंदर तयार करत आहे. महाराष्ट्रात आता वाढवण पोर्टमुळे आपण १ नंबर वर राहणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर वाढवण बंदरामुळे पुढील ५० वर्षे महाराष्ट्र नंबर १ वर राहील असे त्यांनी म्हटले आहे. आम्ही पालघरमधील मच्छिमारांसाठी (Fishermen in Palghar) सोयी उपलब्ध करुण देणार आहोत. या बंदरामुळे पुढील २०० वर्षे मोदींचे नाव इतिहासात राहिल. असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

(हेही वाचा – Mahavikas Aghadi मध्ये आरोप करण्यातही गोंधळ)

मोदींकडून महाराष्ट्राला मोठी भेट – सोनोवाल

पालघरमधील नागरिकांच्या मदतीने वाढवण प्रकल्प मार्गी लागत आहे. हे बंदर म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्राला मोठी भेट आहे असे केंद्रीय जलवाहतूक मंत्री सोनोवाल (Water Transport Minister Sonowal) यांनी म्हटले आहे. तर वाढवण बंदरामुळे १२ लाख लोकांना रोजगार मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (PM Modi Wadhvan Port Bhoomipujan)

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.