ज्या वेळी चंद्रयान ३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले, त्या आनंदाच्या क्षणी पंतप्रधान मोदी ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे होते. त्यांनी live प्रक्षेपणाद्वारे या क्षणाचा आनंद घेतला होता. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, शक्य असल्यास चंद्रयान ३ च्या यशाबद्दल वैयक्तिकरित्या अभिनंदन करू. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ ऑगस्ट, शुक्रवारी २ देशांचा दौरा संपवून ग्रीसच्या पूर्वनिर्धारित दौऱ्यावरून दिल्लीला जाण्याऐवजी आधी थेट कर्नाटकातील बेंगळुरूला जातील. चंद्रयान ३ मोहिमेत सहभागी असलेल्या इस्रोच्या टीमच्या शास्त्रज्ञांची ते भेट घेतील आणि त्यांचे अभिनंदन करतील.
(हेही वाचा – PM Modi Greece Visit : भारतीय पंतप्रधानांनी ४ दशकांनंतर दिली या देशाला भेट, ढोल-ताशांच्या गजरात झाले स्वागत)
भारत आता चंद्रावर आहे
चंद्रयान 3 लँडर ‘विक्रम’ अंतराळात 40 दिवसांच्या प्रवासानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला आहे. चंद्रयानच्या यशस्वी लँडिंगबद्दल पीएम मोदी म्हणाले, “जेव्हा आपण असे ऐतिहासिक क्षण पाहतो, तेव्हा आपल्याला खूप अभिमान वाटतो. ही नवीन भारताची पहाट आहे. आम्ही पृथ्वीवर संकल्प केला आणि चंद्रावर ते साकारले. भारत आता चंद्रावर आहे.”
चंद्रावर चालायला सुरुवात करा
दरम्यान भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने 24 ऑगस्ट, गुरुवारी चंद्रयान 3 च्या कॅमेऱ्यात टिपलेला लँडिंग वेळेचा व्हिडिओ जारी केला. इस्रोने ट्विट केले की, लँडर इमेजर कॅमेर्याने चंद्राची ही छायाचित्रे टचडाउनच्या आधी टिपली. चंद्रयान 3 च्या प्रज्ञान रोव्हरने मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्सला संदेश पाठवला आहे, “चंद्रावरची वाटचाल सुरू झाली आहे.” यापूर्वी इस्रोने सांगितले होते की, मिशनच्या सर्व क्रियाकलाप वेळापत्रकानुसार होत आहेत आणि सर्व यंत्रणा सामान्य आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community