अयोध्यावासी रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनाचा (First Anniversary of Ram Mandir) आनंद दिव्य, भव्य, तेजस्वी, चकाचक अयोध्येत ओसंडून वाहत आहे. प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरा केला जाणारा तीन दिवसांचा वर्धापन दिन सोहळा (Ram Mandir Anniversary Celebration) शनिवारपासून (११ जानेवारी) सुरू होईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) या महोत्सवाचे उद्घाटन करतील. (PM Modi)
हेही वाचा-Dyanradha Multistate Fraud प्रकरणी ED ने सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात
अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनानिमित्त (First Anniversary of Ram Mandir) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक शतकांचे समर्पण, तपस्या आणि संघर्षानंतर स्थापन करण्यात आलेले हे मंदिर आपली समृद्ध संस्कृती आणि अध्यात्मिक वारसा आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.(PM Modi)
अयोध्या में रामलला की प्राण-प्रतिष्ठा की प्रथम वर्षगांठ पर समस्त देशवासियों को बहुत-बहुत शुभकामनाएं। सदियों के त्याग, तपस्या और संघर्ष से बना यह मंदिर हमारी संस्कृति और अध्यात्म की महान धरोहर है। मुझे विश्वास है कि यह दिव्य-भव्य राम मंदिर विकसित भारत के संकल्प की सिद्धि में एक… pic.twitter.com/DfgQT1HorT
— Narendra Modi (@narendramodi) January 11, 2025
पंतप्रधान मोदी (PM Modi) ट्विट करत म्हणाले, “अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त (First Anniversary of Ram Mandir) सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. अनेक शतकांचे समर्पण, तपस्या आणि संघर्षानंतर स्थापन करण्यात आलेले हे मंदिर आपली समृद्ध संस्कृती आणि अध्यात्मिक वारसा आहे. हे दिव्य आणि भव्य राम मंदिर विकसित भारताच्या संकल्पाची प्रेरक शक्ती ठरेल असा मला विश्वास आहे.” असं ते म्हणाले. (PM Modi)
मंदिर 50 क्विंटल फुलांनी सजवले
राम मंदिराच्या (Ayodhya Ram Temple) पहिल्या वर्धापन दिनानिमित्त (First Anniversary of Ram Mandir), मंदिर परिसर 50 क्विंटलहून अधिक फुलांनी सजवला आहे. संपूर्ण मंदिर परिसरात भव्य रोषणाई करण्यात आली आहे. विविध ठिकाणी रामजन्मभूमी (Ram Janmabhoomi) पथ आणि रामपथ (Rampath) देखील सजवले जात आहेत. याशिवाय, व्हीआयपी गेट क्रमांक 11 भव्यपणे सजवण्यात आले आहे. इतर दरवाजेही फुलांनी सजवण्यात आले आहेत. हा कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवून, महानगरपालिका झाडांवर स्ट्रिंग लाईट बसवण्याचे कामही करत आहे. (PM Modi)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community