पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील करिअप्पा परेड मैदानावर एनसीसीच्या वार्षिक रॅलीला शनिवारी सायंकाळी ५.४५ वाजता संबोधित करणार आहेत. यावर्षी एनसीसी स्थापनेचे ७५ वे वर्ष आहे यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ रुपयांचे स्मृती नाणे जारी करणार आहेत.एक भारत श्रेष्ठ भारत या थीमवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. यामध्ये वसुधैव कुटुंबकम भावनेतून १९ देशांमधील १९६ अधिकारी आणि कॅडेट्सनाही सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
( हेही वाचा : मुंबई ते बेलापूर प्रवास होणार सुसाट! वॉटर टॅक्सी फेब्रुवारीत सुरू होणार; किती असणार भाडे? )
टाईम मॅनेजमेंट आईकडून शिका
दरम्यान, अभ्यासासाठी वेळेचे नियोजन (टाईम मॅनेजमेंट) कसे करावे हे तुम्हाला तुमच्या आईकडून शिकता येईल. ते शिकून योग्य पद्धतीने अभ्यासाचे व्यवस्थापन करावे असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विद्यार्थ्यांना दिला. तालकटोरा इथे आयोजित ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या सहाव्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते.
याप्रसंगी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, जर तुम्ही तुमच्या आईची घरातील कामाची शैली पाहिली तर तिच्याकडूनही तुम्ही वेळेचे नियोजन आणि व्यवस्थापन शिकू शकता. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळेचे योग्य वाटप करण्याचं सांगितले. कोणत्या विषयाचा अभ्यास किती दिवस आणि केव्हा करायचा आहे, याचं विश्लेषण करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला. आपल्याला आवडणाऱ्या किंवा माहित असलेल्या विषयांमध्ये आपण जास्त वेळ घालवतो आणि त्यातच गुंतून जातो. ते म्हणाले की, ज्या विषयात तुम्हाला अडचण येते, तो विषय आधी नव्याने वाचण्याचा प्रयत्न करा अशी सूचना त्यांनी केली.
Join Our WhatsApp Community