पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्राच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. नांदेडमधील (Nanded) सभेत (Nanded) बोलतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मराठीतून सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज की जय. सर्वाना राम राम.. नांदेड आणि हिंगोली करांना माझा नमस्कार.. २६ तारखेची तयारी झाली आहे ना? असा प्रश्न विचारत मोदींनी (PM Narendra Modi) भाषणाला सुरुवात केली. एनडीए सरकारमुळे देशात विकास होत असल्याचं सांगताना इंडिया आघाडीवर (India Alliance) त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. (PM Narendra Modi)
२५ कोटी भारतीयांना गरिबातून बाहेर काढले…
पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, “आपल्या देशात 2024 पूर्वी नैराश्याचे वातावरण होते. वीज, पाणी, रस्त्यांच्या अनेक गावात समस्या होत्या. मात्र, गेल्या 10 वर्षात आपल्या सरकारने 25 कोटी भारतीयांना गरिबातून बाहेर काढले. देशात 50 कोटींहून अधिक बँक खाते नव्याने उघडले आहेत. आता, विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचं स्वप्न दूर नाही. मोदी (PM Narendra Modi) जो गॅरंटी देतो, त्यासाठी दिवसरात्र खपायला मी तयार आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे की, पुढील 5 वर्षात ३ कोटी घरं बनवणार. नळाद्वारे प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचणार आहे. आपल्या कुटुंबातील वृद्ध, आई-वडिल यांच्यावरील उपचार खर्चासाठी 5 लाख रुपयांपर्यतचा खर्च शासन करणार आहे. तसेच, ज्याप्रमाणे नळातून पाणी येते, तशाच रितीने पाईपमधून गॅस येणार आहे. देशातील प्रत्येक कोपऱ्यात वंदे भारतप्रमाणे रेल्वे धावतील. भारताने चंद्रयान पाहिले, आता गगनयानही पाहणार आहे.” असे आश्वासन मोदींनी दिले. (PM Narendra Modi)
काँग्रेसने दिलेल्या प्रत्येक जखमेवर उपचार करणे, ही मोदीची गॅरंटी
“निवडणुकीच्या अगोदरच काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी पराभव पत्कारला आहे. या निवडणुकीत विरोधकांना उमेदवार मिळत नाहीत. २५ टक्के जागांवर इंडिया आघाडीचे उमदेवार आपआपसात निवडणूक लढवणार आहे. त्यांच्यावर विश्वास कसा ठेवणार? ही लोक एकत्र लढवून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. काँग्रेसच्या ७० वर्षांच्या कामानंतर मोदी (PM Narendra Modi) सरकारने केलेली विकास कामे जनतेसमोर आहेत. काँग्रेसने दिलेल्या प्रत्येक जखमेवर उपचार करणे, ही नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे. मराठवाड्याचा विकास करणे ही मोदी यांची गॅरंटी आहे.” असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. (PM Narendra Modi)
बारशाला गेला आणि बाराव्याला आला…
“काँग्रेस आणि इंडी आघाडी नेहमीच विकासविरोधी आणि शेतकरी विरोधी राहिली आहे. त्यामुळेच, देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. काँग्रेस आघाडीच्या कामकाजासाठी मराठीत एक म्हण आहे, बारशाला गेला आणि बाराव्याला आला…” असे म्हणत मोदींनी (PM Narendra Modi) काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर बोचरी टीका केली. यापूर्वी नागपूरच्या पहिल्या सभेतही मोदींनी मराठी म्हणीचा उल्लेख केला होता. त्यावेळी, पाण्यावर काठी मारल्यानंतर पाणी दुभंगत नाही, असे मोदींनी म्हटले होते. आता, पुन्हा एकदा मराठी म्हणीतून काँग्रेसवर हल्लाबोल केला. (PM Narendra Modi)
हे पहा –
Join Our WhatsApp Community