तीन राज्यांच्या निवडणुकांवरील निकालावर काय म्हणाले पंतप्रधान?

164

त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील मतदारांचे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच या माध्यमातून पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी पुढील ध्येय आखून दिले.

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच ईशान्य भारतातील जनतेचे विशेष आभर मानले. सर्वात आधी ईशान्य भारतातील सर्व नागरिकांच्या सन्मानार्थ आपापले मोबाईल काढून फ्लॅश लाइट सुरु करुन अनोख्या पद्धतीने त्यांचे अभिनंदन करुया, असे मोदींनी सांगितले. सर्व उपस्थितांनी आपल्या मोबाईलची फ्लॅश लाइट लावून भाजपाच्या विजयासंदर्भातील घोषणाबाजी केली. मी नतमस्तक होऊन ईशान्य भारतातील नागरिकांचे आभार मानतो. सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. तेथील कार्यकर्ते हे आमच्यापेक्षा अधिक मेहनत घेत आहेत, त्यामुळेच मी त्यांचे विशेष अभिनंदन करतो. आजचे निकाल हे देशाबरोबर जगभरातील लोकांसाठी संदेश आहे. भारतामध्ये आजही लोकशाहीवर किती विश्वास आहे आणि लोकशाही किती सक्षम आहे हे दर्शवणारे आजचे निकाल आहेत, असे असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

(हेही वाचा सावरकर स्मारकात गुरु – शुक्र युती पाहण्याचा खगोलप्रेमींनी लुटला आनंद )

काँग्रेसवर टीका

ईशान्य भारतामधील विजयानंतर मोदींनी काँग्रेसलाही लक्ष्य केले. “काँग्रेसने छोट्या राज्यांविरोधात आपल्या मनातील द्वेष जाहीरपणे सांगितला आहे. त्यांचे नेतृत्व म्हणते की ही तर छोटी राज्ये आहेत, ही फार महत्त्वाची नाहीत. अशाप्रकारे या राज्यांकडे तिरस्काराने पाहून काँग्रेस मोठी चूक करत आहे. याच विचारांमुळे छोट्या राज्यांना, गरीब आदिवासी लोकांना दूर्लक्षित करण्यात आले. छोट्या राज्यांमधील लोकांबद्दल असलेला हा काँग्रेसचा द्वेषभाव येणाऱ्या निवडणुकींमध्ये पक्षाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरणार आहे, असा टोला मोदींनी लगावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.