PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी गरीब जनतेसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

101

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी गरीब जनतेसाठी मोठी घोषणा केली. मोफत रेशन योजना आणखी पाच वर्षांसाठी वाढवली जाईल, असे त्यांनी म्हटले. भाजपा सरकार आता देशातील 80 कोटी गरीब लोकांना मोफत रेशन देण्याची योजना पुढील 5 वर्षांपर्यंत वाढवणार आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मला नेहमी मोठे निर्णय घेण्यासाठी बळ देते, असे पंतप्रधानांनी म्हटले.

काँग्रेसने गरिबांची कधी कदर केली नाही 

काँग्रेसने गरिबांना फसवणुकीशिवाय काहीही दिले नाही. काँग्रेसने गरिबांची कधीच कदर करत नाही. गोरगरिबांचे दु:ख त्यांना कधीच कळत नाही. त्यामुळे जोपर्यंत काँग्रेस केंद्र सरकारमध्ये राहिली तोपर्यंत गरिबांचे हक्काचे पैसे लुटून खात राहिली आणि आपल्या नेत्यांच्या तिजोरीत भरत राहिली. 2014 मध्ये सरकार आल्यानंतर तुमच्या या मुलाने गरीब कल्याणाला सर्वात जास्त प्राधान्य दिले. आम्ही आमच्या गरीब बंधू-भगिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण केला की त्यांची गरिबी दूर केली जाऊ शकते. आमच्या सेवेच्या अवघ्या 5 वर्षात 13.5 कोटीहून अधिक लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. गरिबीतून बाहेर आलेले आज लाखो आशीर्वाद देत आहेत. भाजपा सरकारने अत्यंत संयमाने आणि प्रामाणिकपणे काम केले. भाजपा सरकारने अशी व्यवस्था केली आहे की तुम्ही देशाच्या कोणत्याही भागात गेलात तरी तुम्हाला मोफत रेशन मिळत राहील. म्हणूनच वन नेशन-वन रेशन कार्डची सुविधा दिली आहे, असेही PM Narendra Modi म्हणाले.

(हेही वाचा Nepal Earthquake : भारत नेपाळला शक्यतोपरी सर्व मदत करणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.