त्यांच्यापासून आपण सावध रहायला हवं, मोदींचं आवाहन

82

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भाजपच्या देशभरातील पदाधिका-यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप नेत्यांना पुढील 25 वर्षांच्या दृष्टीनं पावले उचलण्यास सांगितले. तसेच काही पक्ष लोकांचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यापासून आपण सावध रहायला हवं, असं आवाहनही मोदींनी यावेळी केलं आहे.

त्यांच्या जाळ्यात अडकू नका

आगामी काळात गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींनी सर्व भाजप पदाधिका-यांची भेट घेतली. त्यावेळी मोदींनी विरोधकांवर नाव न घेता निशाणा साधला. काही लोक मूळ मुद्द्यावरुन लोकांचं लक्ष दुसरीकडे भरकटवत आहेत. काही पक्षांचं ते कामच झालं आहे. त्यामुळे आपण त्यांच्या जाळ्यात न अडकता त्यांच्यापासून सावध रहायला हवं, असं मोदींनी यावेळी म्हटलं आहे.

(हेही वाचाः भाजपच्या पडळकरांनी चूक दाखवताच पवारांनी डिलीट केले ‘ते’ ट्वीट)

25 वर्षांसाठी उद्दिष्ट निश्चित करायला हवं

आपण आता पुढील 25 वर्षांसाठीचं उद्दिष्ट निश्चित करायला हवे. त्याप्रमाणेच आपण आपली पावलं उचलायला हवीत. सर्व अडचणींवर मात करत सातत्याने देशाच्या नागरिकांसाठी काम करत राहणं आणि त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करणं हे आपलं ध्येय्य असायला हवं, असंही मोदी यावेळी म्हणाले. भाजपची केंद्रात सत्ता येऊन आता 8 वर्ष पूर्ण होणार आहेत. ही वर्ष देशाची सेवा करण्याची होती. त्यामुळे यापुढेही आपण याच धोरणांनुसार काम करुन, राष्ट्रउभआरणीच्या कामात झोकून देऊन काम करायला हवं, असं आवाहनही मोदींनी केलं आहे.

(हेही वाचाः त्यांच्यापासून आपण सावध रहायला हवं, मोदींचं आवाहन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.