ओडिशाच्या बालासोर (Odisha Train Accident) येथे शुक्रवारी संध्याकाळी तीन रेल्वे गाड्यांची टक्कर होऊन भीषण अपघात घडला. यामध्ये आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला असून ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बालासोरला घटनास्थळी जाऊन भेट दिली. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक उपस्थित होते.
ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातानंतर युध्दपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः शनिवारी बालासोर मध्ये येऊन घटनेचा आढावा घेतला. महाराष्ट्रातील मुंबई ते गोव्यातील मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसचे शनिवारी पंतप्रधान आभासी पद्धतीने उद्घाटन करणार होते. परंतु, ओडिशातील भीषण रेल्वे अपघातामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. ओडिशातील अपघातस्थळाची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान, रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. (Odisha Train Accident)
(हेही वाचा – Odisha Train Accident : जखमी प्रवाशांना मदत देणे आमची प्राथमिकता; अश्विनी वैष्णव मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही)
त्यानंतर एका प्रसार माध्यमाशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘या अपघातामध्ये अनेक राज्यांतील प्रवाशांचे काही ना काही नुकसान झाले आहे. मन अस्वस्थ करणारी ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. जे लोकं जखमी झाले आहेत त्यांच्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. सरकारसाठी हा मुद्दा गंभीर आहे. याची कसून चौकशी केली जाईल, जो दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही. त्यांना कठोर शिक्षा होईल. रेल्वे रुळ पूर्ववत करण्याचे काम करत आहे.’ (Odisha Train Accident)
#WATCH | “It’s a painful incident. Govt will leave no stone unturned for the treatment of those injured. It’s a serious incident, instructions issued for probe from every angle. Those found guilty will be punished stringently. Railway is working towards track restoration. I met… pic.twitter.com/ZhyjxXrYkw
— ANI (@ANI) June 3, 2023
सरकारी पातळीवर मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी देखील मदत आणि बचाव कार्यात योगदान दिले. ओडिशातल्या अनेक रुग्णालयांमध्ये रक्तदान करण्यासाठी तरुणांची गर्दी होत आहे. रेल्वे अपघातातील मृतांची संख्या वाढली असली तरी जखमींची संख्या त्यापेक्षा मोठी आहे. त्यामुळे जखमींवरील उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज आहे. ही गरज ओळखूनच अनेक संस्था पुढे येऊन तरुणांना रक्तदान करण्याचे आवाहन करीत आहेत. तरुणांनीही त्याला प्रतिसाद देत अनेक रुग्णालयांमध्ये रक्तदानासाठी गर्दी केली आहे. केंद्र सरकार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, ओडिशा या तिन्ही राज्य सरकारांनी त्यांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आपापल्या आपत्कालीन निधीतून मोठी मदतही जाहीर केली आहे. (Odisha Train Accident)
ओडिशातील बालासोर येथे शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे १० ते १२ डबे रुळावरून घसरले आणि विरुद्ध रुळावर पडले. त्यामुळे यशवंतपूरहून हावडाकडे जाणाऱ्या आणखी एका रेल्वेचे डबे रुळावरून घसरल्याने अपघात झाला. त्यातील ३ ते ४ डबे रुळावरुन घसरले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वे रुळावरून घसरल्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. (Odisha Train Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community