पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज (१० एप्रिल) नागपूरच्या (Nagpur) कन्हानमध्ये (Kanhan) सभा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा सभास्थळाची पाहणी केली होती. रामटेक (Ramtek) लोकसभा (Lok Sabha Election 2024) मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांची प्रचारसभा पार पडणार आहे. तर, विदर्भात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सभास्थळाला देखील या पावसाचा काही प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे पावसानं कितपत नुकसान झाले हे पाहण्यासाठी आणि त्यात सुधारणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) सभा कशी यशस्वी करता येईल? यासाठी मुख्यमंत्र्यांनी सभास्थळाची पाहणी केली.
(हेही वाचा – Dahisar West Skywalk : दहिसर पश्चिमच्या स्कायवॉकची पुनर्बांधणी की केवळ मलमपट्टी?)
पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) सभेसाठी मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना काही महत्वाच्या सूचना दिल्या. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल आणि शिवसेनेचे पूर्व विदर्भातील पदाधिकारी उपस्थित होते. कन्हानमधील ब्रुक बाँड या बंद पडलेल्या चहा कंपनीच्या 18 एकराच्या आवारात ही सभा होणार असून पोलिसांनी मंगळवारपासूनच सभास्थानाचा पूर्ण ताबा आपल्याकडे घेतला आहे.
नागपूर वेध शाळेचा ऑरेंज अलर्ट जाहीर
नागपूरसाठी नागपूर वेध शाळेनं ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. सभास्थळी डोम उभारले असल्याने विशेष फरक पडणार नसल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. मात्र नेमका सभेच्या वेळी पाऊस कोसळला तर तारांबळ उडण्याची शक्यता आहे. (PM Narendra Modi)
हे पहा –
Join Our WhatsApp Community