सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी-२० देशांच्या बैठकीसाठी इटली येथे गेले आहेत. तिथे मात्र त्यांना भारतीय लोक जिथे भेटतील तिथे गराडा घालत आहेत. आपल्या देशाचा नेता आला, हे पाहून तेथील भारतीय भारावून जात आहेत. विशेष म्हणजे मोदी यांना भारतातील विविध राज्यातील, भाषिक भेटत आहेत आणि ते चक्क त्यांच्याशी त्यांच्या त्यांच्या मातृभाषेत बोलत आहेत. विशेष म्हणजे मोदीदेखील त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत संवाद साधत आहेत. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या या गुणाने तेथील भारतीयांना वेडावून सोडले आहे.
जेव्हा मोदी विचारतात, ‘तुझे नाव काय काय?’
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २९ ते ३१ ऑक्टोबर हे तीन दीवर रोम येथे मुक्कामी आहेत. त्या दरम्यान त्यांना तेथील भारतीय जेथे शक्य होईल तिथे भेटत आहेत. अशाच एका ठिकाणी पंतप्रधान मोदी यांना अभिवादन करत असताना गर्दीतून अचानक एक पगडीधारी व्यक्ती समोर आली आणि म्हणाली, ‘नमस्कार, मी नागपूरचा!’ नंतर पंतप्रधान मोदी यांनी त्या पगडीधारी व्यक्तीला मराठीतच विचारले, ‘तुझे नाव काय आहे?’ त्यानंतर त्या व्यक्तीशी मराठी भाषेतच संभाषण सुरू ठेवले. पंतप्रधानांनी त्याला विचारले की, ‘तो या देशात काय करतो?’ त्यावर त्या व्यक्तीने सागितले की, ‘तो २२ वर्षे इटलीमध्ये योग शिकवतो, तसेच आयुर्वेदिक उपचारपद्धतीचा प्रचार करत आहे.’, त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तुमच्यावर प्रभावित झालो आहे.’
'रोम' के रोम में बस गये मोदी! pic.twitter.com/hB2iBt23zG
— Sunil Deodhar (@Sunil_Deodhar) October 29, 2021
(हेही वाचा : आली लगीनघाई, कोरोनाला निमंत्रण देई…)
मोदी म्हणतात, ‘माजा मा’!
पंतप्रधान मोदी या भारतीयांनी घातलेल्या गराड्यातून आणखी एक आवाज आला, तो एक महिलेचा होता. ती महिला उत्साहाने मोठ्या आवाजात ओरडली, ‘केम चो’. त्या महिलेचा आवाज ऐकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिच्या दिशेने पाहत ‘माजा मा’, असे उत्तर दिले. त्यावेळी त्या महिलेलाही आनंद झाला.
असा आहे मोदींचा दौरा!
जागतिक अर्थव्यवस्था सुधारणे आणि कोरोना संकटाचा सामना करण्यासाठीच्या उपाययोजनांवर पंतप्रधान मोदी हे रोममध्ये बोलणार आहेत. एवढेच नाही तर या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ख्रिश्चनांचे सर्वात मोठे धर्मगुरू पोप यांचीही भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान ते व्हॅटिकन सिटीलाही भेट देतील आणि पोप फ्रान्सिस यांची भेट घेणार असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या निवेदनात म्हटले होते. पंतप्रधान मोदी पोप फ्रान्सिस यांना भेटण्याची त्यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच वेळ आहे. २९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ते रोममध्ये असतील. यानंतर ते ग्लासगो येथे हवामान बदलावरील शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी जाणार आहेत.
Join Our WhatsApp Community