PM Narendra Modi : आजकाल भ्रष्टाचाऱ्यांना खांद्यावर घेऊन…; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केजरीवालांवर हल्लाबोल

आपल्या देशात जेव्हा कोणी लोक भ्रष्टाचारात पकडले जायचे किंवा आरोपी व्हायचे, तेव्हा इतर लोक त्यांच्यापासून शंभर पावले दूर जायचे. आजकाल भ्रष्टाचाऱ्यांना खांद्यावर घेऊन नाचण्याची फॅशन झाली आहे, असे PM Narendra Modi म्हणाले.

190
Narendra Modi: ६० वर्षांत पहिल्यांदाच एखाद्या सरकारने हॅटट्रिक केली, काशीत मोदी म्हणाले...
Narendra Modi: ६० वर्षांत पहिल्यांदाच एखाद्या सरकारने हॅटट्रिक केली, काशीत मोदी म्हणाले...

तपास यंत्रणांच्या कारवाईत आमची कुठलीही भूमिका नाही. विरोधकांकडून होणारा भ्रष्टाचाऱ्यांचा गौरव देशासाठी चिंतेचा विषय आहे. आपल्या देशात जेव्हा कोणी लोक भ्रष्टाचारात पकडले जायचे किंवा आरोपी व्हायचे, तेव्हा इतर लोक त्यांच्यापासून शंभर पावले दूर जायचे. आजकाल भ्रष्टाचाऱ्यांना खांद्यावर घेऊन नाचण्याची फॅशन झाली आहे. कालपर्यंत ज्या गोष्टींचा विरोध करायचे, आज त्यांना जवळ घेत आहेत. पूर्वी हेच लोक सोनिया गांधींना (Sonia Gandhi) तुरुंगात टाकण्याची भाषा करायचे, आता सोबत आहेत, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केला. ते अरविंद केजरीवाल यांच्याविषयी बोलत होते.

(हेही वाचा – Vizag Railway Station: विझांग म्हणजेच आताचे विशाखापट्टणम रेल्वे स्थानकाबाबत जाणून घेऊयात काही रंजक गोष्टी  )

भ्रष्टाचार आणि अन्वेषण यंत्रणांच्या कारवाईवर भाष्य

लोकसभा निवडणुकीचा (loksabha election 2024) शेवटचा टप्पा येत्या 1 जून रोजी होणार आहे. शेवटचा टप्पा असला, तरी सर्वच पक्षांचा प्रचार जोरदार सुरू आहे. दरम्यान, या सातव्या टप्प्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचार आणि अन्वेषण यंत्रणांच्या कारवाईवर मत व्यक्त केले.

…त्यांनी देशाचे नुकसान केले

या वेळी पंतप्रधान मोदींनी देशाविरोधात वक्तव्ये करणाऱ्या लोकांवरही निशाणा साधला. “चुकीच्या गोष्टी सांगणाऱ्यांनी देशाचे खूप नुकसान केले. पूर्वी बाहेरून वस्तू देशात यायच्या, तेव्हा हे लोक म्हणायचे आम्ही देश विकत आहोत. आता देशात वस्तू बनवल्या जातात, तर हेच लोक म्हणतात की, हे जागतिकीकरणाचे युग आहे आणि तुम्ही लोक काय देशातच वस्तू बनवण्याच्या गप्पा मारता. अमेरिकेत कोणी अमेरिकन व्हा, अमेरिकेतील वस्तू विकत घ्या, म्हटल्यावर आपल्याला अभिमान वाटतो. मी जर हे देशातील लोकांना म्हटले, तर मला जागतिकीकरणाच्या विरोधात असल्याचे सांगतात,” अशी टीका पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.