PM Narendra Modi : ‘टीम मेलोडी’पासून सावधान!

171
India's Universities: जागतिक स्तरावर भारतीय विद्यापीठांच्या चढत्या आलेखाचे पंतप्रधानांकडून कौतुक
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

राजकारणात मोठं व्हायचं असेल आणि आपलं मोठेपण टिकवून ठेवायचं असेल तर जे अनेक घटक महत्त्वाचे असतात, त्यापैकी एक महत्वाचा घटक म्हणजे चारित्र्य. तुमचं चारित्र्य, वागणं कसं आहे, त्यापेक्षा ते लोकांसमोर कसं दिसतं याला अधिक महत्त्व आहे. जेव्हा महात्मा गांधी यांचे वडील वारले तेव्हा ते आपल्या पत्नीसोबत संभोग करत होते, अशी कबुली खुद्द गांधींनी आपल्या आत्मचरित्रात दिली. यावरून पुरोगामी विश्वात आनंदाची लाट उसळली. बघा, एक हिंदू नेता अशी कबुली देऊ शकतो, म्हणून गांधी महात्मा ठरतात.

हे डॅशिंग आणि बोल्ड वक्तव्य करताना त्यांनी आपल्या चुकांना ब्राह्मचर्याचे प्रयोग असं गोंडस नाव दिलं. आधुनिक राजकारणाची सुरुवात गांधी-नेहरूंनी केली. त्याआधी राजकारण केवळ देशासाठी म्हणजेच देश स्वातंत्र्यसाठी केलं जायचं. आपण कसं दिसावं याचा विचार गांधीजींनी केला होता. म्हणून भारतात परत येताना त्यांनी आपली वेशभूषा बदलली. गांधीजींचा अभ्यास आपण महात्मा म्हणून उगाच करतो. उलट आधुनिक राजकारणी म्हणून त्यांचा अभ्यास व्हायला हवा. तेव्हा आपल्याला कळेल की १०० शरद पवार म्हणजे एक गांधी. सांगायचं तात्पर्य या गोष्टी राजकारणात महत्त्वाच्या असतात.

(हेही वाचा – आदित्य ठाकरे पुन्हा वरळीत उभे राहतात की घाबरून…, Shrikant Shinde यांचा खोचक टोला)

मोदी २०१४ ला भारताचे पंतप्रधान झाले. त्याआधी तीन वेळा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. आता ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. या एकंदर राजकीय प्रवासात त्यांचे चारित्र्य शुद्ध आहे. राष्ट्रीय कार्य म्हणून प्रभू रामाची उपासना करताना आपले चरित्र्यही आपल्या प्रभूंसारखे असावे ही मोदींची प्रतिज्ञा आहे. त्यांच्यावर तुम्ही कितीही खोटे आरोप लावले तरी स्त्री व भ्रष्टाचाराचे खोटे आरोप लावू शकत नाही, हे मोदींचं चरित्र आहे. (PM Narendra Modi)

अशा परिस्थितीत भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी आणि मोदी यांचे व्हिडीओ शेअर करत बाबू, शोना का म्हणत असतात? भाजपच्या सोशल मीडिया सेलने याबाबत गंभीर दखल घेतली पाहिजे. मोदी हे तुमच्या विनोदाचं किंवा मनोरंजनाचं साधन नाही. ते भारताचे पंतप्रधान आहेत. तुम्हाला माहिती तरी आहे का, की हे व्हिडीओ, मिम्स विरोधकांकडून बनवण्यात येत आहेत, मोदींचं चारित्र्यहनन करण्यासाठी? सोशल मीडियाची ताकद काय आहे, हे जाणून घेण्यासाठी the broken news या वेबसिरीजचा दुसरा सीजन बघा. तुम्हाला जेव्हा हरवता येत नाही तेव्हा तुम्हाला सोशल मीडियाच्या फेक जाळ्यात ओढलं जातं आणि तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. मी जे नॅरेटिव्ह म्हणतो, ते हेच आहे. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – NEET UGच्या पुनर्परीक्षेत १५६३ पैकी ७५० विद्यार्थी गैरहजर, CBIने पहिला FIR नोंदवला)

इटलीच्या पंतप्रधान मेलोनी आणि भारताचे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांचे मिम्स शेअर करून हाच हेतू त्यांना साधायचा आहे. त्यामुळे तुम्ही या नॅरेटिव्हला बळी पडू नका. कृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खोटा आरोप ठेवण्यात आला होता. तेव्हा कृष्णाने पुराव्यासह तो आरोप खोडून काढला आणि आपले चारित्र्य शुद्ध आहे हे सिद्ध केले होते. मोदींजींनी गुजरात दंगलीबाबत हीच परीक्षा दिली होती. त्यामुळे सोशल मीडियावर रेंगाळणारे भाजपचे तरुण कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी बोध घेण्याची गरज आहे. जर ही तत्वे तुम्हाला पाळायची नसतील तर राजकारणातून चालते व्हा. हे क्षेत्र तुमच्यासाठी नाही. मोदीजी आणि मेलोनीजी यांच्यात चांगलं मैत्रीचं नातं आहे हे तुम्ही समजावून सांगू शकला असता. पण तुम्ही विरोधकांच्या नॅरेटिव्हला बळी पडला. वेळेत सावध व्हा! (PM Narendra Modi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.