PM Narendra Modi Birthday: मोदींच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त सूरतमध्ये जोरदार तयारी

177
Union Cabinet Meeting: मोदी सरकारने विद्यालक्ष्मी योजनेला दिली मंजुरी, जाणून घ्या काय होणार फायदे?
Union Cabinet Meeting: मोदी सरकारने विद्यालक्ष्मी योजनेला दिली मंजुरी, जाणून घ्या काय होणार फायदे?

१७ सप्टेंबर २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. मोदी ७४ वर्षांचे होतील. पंतप्रधान मोदींच्या या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) सेवा पंधरवडा (१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर) सुरू करणार आहे. स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या पंतप्रधानाची ऊर्जावान, समर्पित, दूरदर्शी आणि दृढनिश्चयी राजकारणी अशी प्रतिमा आहे. ते सलग तिसऱ्यांदा केंद्रात पंतप्रधानपदाची धुरा सांभाळत आहेत. मोदींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या गृहराज्यात मोठी तयारी सुरु आहे. मोदींच्या जन्मदिनी सूरतमध्ये विशेष सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे.  (PM Narendra Modi Birthday)

मोदींच्या वाढदिवसानिमित्त सूरतमधील (Surat) व्यापारी आणि ऑटो रिक्षा चालक खास सवलत देणार आहेत. सूरतमधील रेस्टॉरंट, हॉटेल, कपड्याची दुकानं, मिठाईची दुकानांमध्ये विशेष सवलत देण्यात येईल. तसेच रेस्टॉरंट, हॉटेल, कपडे, मिठाई दुकानं चालवणारे २५०० व्यापारी त्यांच्या दुकानांमध्ये १० ते १०० टक्क्यांची सवलत देणार आहेत. तर १६ सप्टेंबर रोजी रिक्षा चालक प्रवाशांना मोफत प्रवास घडवणार आहेत. तसेच १७ सप्टेंबरला सूरतमध्ये गणपती विसर्जन (Ganesha Visarjan) असणार आहे, त्यामुळे दुकानं बंद असतील. शनिवार, रविवार, सोमवार असे तीन दिवस सुट्टी आहे. त्यामुळे  ग्राहकांना किती सूट द्यायची हा निर्णय व्यापारी ठरवतील. (PM Narendra Modi Birthday)

(हेही वाचा – भारत-बांगलादेश क्रिकेट सामना रद्द करा; हिंदु जनजागृती समितीची BCCI कडे मागणी !)

“आमच्या मतदारसंघात दरवर्षी पंतप्रधान मोदींचा वाढदिवस आनंदात, उत्साहात साजरा होता. त्यानिमित्तानं सेवाकार्याचं आयोजन करण्यात येतं, अशी माहिती भाजपाचे नेते पूर्णेश मोदींनी (BJP leader Purnesh Modi) दिली.” ‘ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आम्ही सेवा करुन साजरा करतो. विविध व्यावसायिक असलेले लोक एकत्र येतात. कोणी हॉटेल व्यवसायातला असतो, तर कोणी रेस्टॉरंट क्षेत्रातला असतो, कोणी रिक्षा चालक असतो, तक कोणी क्लिनीक चालवणारा असतो, कोणी डेअरी मालक असतो, तर कोणी बेकरीशी संबंधित असतो. विविध व्यवसायांशी संबंधित २५०० व्यापारी त्यांच्या दुकानांमध्ये १० ते १०० टक्के सवलत देतात. चार दिवस ही सूट असते,’ अशी माहिती पूर्णेश मोदी यांनी दिली.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.