गेल्या 10 वर्षांत भारताने जी गती गाठली, ती अभूतपूर्व आहे. आता देशाची स्वप्नेही मोठी असतील आणि संकल्पही प्रचंड असतील. हाच विकसित भारताचा संकल्प आहे. आज विरोधी पक्षाचे नेतेही ‘एनडीए सरकार 400 पार’च्या घोषणा देत आहेत. एनडीएला 400 चा टप्पा पार करण्यासाठी भाजपला 370 चा टप्पा पार करावा लागेल,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) ध्येय दिले. ते रविवार, 18 फेब्रुवारी रोजी राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय अधिवेशनात कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या नेत्यांना संबोधित करत होते. (PM Narendra Modi BJP Convention)
(हेही वाचा – Food Of Andaman And Nicobar Islands: अंदमान-निकोबर बेटांवरील पाककला संस्कृती !)
…तर करोडो गरिबांना घरे बांधता आली नसती
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, भाजपचे कार्यकर्ते 24 तास देशाच्या सेवेत गुंतलेले आहेत. येणारे 100 दिवस नव्या ऊर्जेने आणि नव्या उमेदीने काम करायचे आहेत. आम्ही राजकारण न करता राष्ट्रीय धोरणासाठी बाहेर पडलो आहोत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत. जेव्हा त्यांचा राज्याभिषेक झाला, तेव्हा त्यांना आनंद झाला नाही. त्यांनी आपले ध्येय चालू ठेवले. त्याचप्रमाणे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन स्वतःच्या सुख-समृद्धीसाठी जगणारा मी नाही. मी भाजप सरकारची तिसरी टर्म सत्ता उपभोगण्यासाठी मागत नाही. मी देशासाठी संकल्प घेऊन बाहेर पडलेली व्यक्ती आहे. घरांची काळजी असती, तर आज करोडो गरिबांना घरे बांधता आली नसती. मी जगतो, जागतो आणि देशाच्या मुलांच्या भविष्यासाठी लढत राहीन.
सर्वांत मोठी आर्थिक शक्ती बनवण्याचा संकल्प
योजना कशा पूर्ण करायच्या, हे आपल्या विरोधी पक्षांना माहीत नसेल; पण खोटी आश्वासने देण्याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. हे सर्व राजकीय पक्ष आश्वासने देतांना घाबरतात. आमचे वचन विकसित भारताचे आहे. आपण भारताला विकसित करू शकत नाही, हे या लोकांनी मान्य केले आहे. हे स्वप्न पाहणारे फक्त भाजप (BJP) आणि एनडीए (NDA) आघाडी आहे. 2047 पर्यंत भारत विकसित करण्यासाठी आम्ही काम करू. तिसऱ्या टर्ममध्ये भारताला जगातील तिसरी सर्वांत मोठी आर्थिक शक्ती बनवण्याचा संकल्प आम्ही केला आहे. ही मोदींची गॅरंटी आहे, असे पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले. (PM Narendra Modi BJP Convention)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community