महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी मुंबईत दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर आणि मुंबईत विविध प्रकल्पाचे उदघाटन होणार आहे. यावेळी मुंबईच्या बीकेसी येथील ग्लोबल फिनटेक फेस्टच्या (Global FinTech Fest) कार्यक्रमातही पंतप्रधान मोदींनी हजेरी लावली होती. यावेळी भाषणादरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. भारतातील फिनटेक क्रांतीबाबत (Indian FinTech Revolution) प्रश्न उपस्थित करणाऱ्या नेत्यांचा खरपूस समाचार यावेळी पंतप्रधानांनी घेतला. तसेच “तुम्हाला आठवत असेल की काही लोक संसदेत उभे राहून प्रश्न विचारत असत आणि जे लोक स्वतःला विद्वान समजत होते ते त्या वेळी प्रश्न विचारत होते. पण जेव्हा सरस्वती बुद्धी वाटत होती, तेव्हा तेच आधी वाटेत उभे होते. भारतात पायाभूत सुविधा नाहीत असे विरोधक म्हणायचे असं पंतप्रधान मोदी म्हणाले. (PM Narendra Modi BKC)
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “मागच्या 10 वर्षात फिनेटक स्टार्टअपमध्ये 500 टक्के वाढ झालीय. स्वस्त मोबाइल, स्वस्त डेटा आणि झिरो बॅलन्स जनधन बँक खात्याने भारतात कमाल केलीय. काही लोक आधी संसदेत उभं राहून विचारायचे, स्वत:ला विद्धवान मानायचे, सरस्वती बुद्धी वाटत होती, तेव्हा ते रस्त्यात आधीच उभे होते” असा टोमणा पीएम मोदींनी मारला. “बोलायचे, विचारायचे भारताता बँक शाखा नाहीत, इंटरनेट नाहीय वीज नाहीय, रिचार्जिंग कुठे होणार? फिनेटक क्रांती कशी होणार? माझ्यासारख्या चहावाल्याला विचारायचे. आज बघा एक दशकात भारतात ब्रॉड बँड युजरची संख्या 60 मिलियन म्हणजे 6 कोटीने वाढून 94 कोटी झाली. आज कदाचितच कोणी भारतीय असेल, ज्याच्याकडे डिजिटल आयडेंटी आधारकार्ड नाहीय” असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. (PM Narendra Modi BKC)
(हेही वाचा – Vishalgarh चे जतन करण्यासाठी बेकायदा बांधकामे हटविणे आवश्यक; पुरातत्व विभागाचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र)
मुद्रा योजनेचा सर्वात मोठा फायदा महिलांना
“जनधन योजना (Jan Dhan Yojana) महिला सबलीकरणाच खूप मोठं माध्यम बनली आहे. जनधन योजनेमुळे 29 कोटीपेक्षा जास्त महिलांची बँकखाती उघडली गेली. या खात्यात महिलांना बचत आणि गुंतवणूकीची नवीन संधी मिळाली. या जनधन खात्याच्या विचारावर मायक्रोफायनान्सची सर्वात मोठी मुद्रा योजना लॉन्च केली. या योजनेतून आतापर्यंत 27 ट्रिलियन पेक्षा अधिक कर्ज दिलय. या योजनेच्या 70 टक्के लाभार्थी महिला आहेत. जनधन कार्यक्रमाने महिलांसाठी आर्थिक सबलीकरणाचा पाया रचला आहे” असं पीएम मोदी म्हणाले. (PM Narendra Modi BKC)
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community