प्राण पणाला लावून देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी देखील कायम ठेवली आहे. यंदा पंतप्रधान दिवाळीसाठी कारगील सीमेवर दाखल झालेत. पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करत पंतप्रधान दिवाळीसाठी कारगिलला डेरेदाखल झाल्याची माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी 2014 सालीही सियाचीनमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. यंदा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी जवानांसह ‘वंदे मातरम्’ हे गाणं गायलं. जवानांसोबत देशभक्तीपर गाणं गात जवानांचा उत्साह वाढवला.
A spirited Diwali in Kargil! pic.twitter.com/qtIGesk98x
— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2022
पंतप्रधान होण्याआधीही मोदी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही ते दिवाळीला सैनिकांमध्ये जात असे. त्याचवेळी पंतप्रधान कारगिलला पोहोचले, तेव्हा लडाख प्रशासनाने विशेष व्यवस्था केली होती. त्यानंतर 2015 मध्ये ते जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पंजाब सीमेवरही गेले होते. तर 2016 मध्ये, पंतप्रधान हिमाचल प्रदेशातील एका चौकीवर इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस कर्मचार्यांसोबत दीपोत्सव साजरा केला होता. तसेच 2017 मध्ये, त्यांनी काश्मीर विभागातील बांदीपोर जिल्ह्यातील गुरेझ व्हॅलीमध्ये लष्कराचे जवान आणि सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.
(हेही वाचा – कापसाच्या शेतात केली गांजाची लागवड, तीन शेतकऱ्यांवर गुन्हा अन्…)
पंतप्रधानांनी 2019 मध्ये जम्मू विभागातील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर तैनात सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. तर 2020 मध्ये पीएम मोदींनी राजस्थानमधील जैसलमेर येथील लोंगेवाला येथे सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. यंदा जवानांसोबत दीपोत्सवाची परंपरा कायम ठेवत यंदा त्यांनी कारगिलची निवड केलीय.
Join Our WhatsApp Community