राज्यांनो, लॉकडाऊनवर अवलंबून राहू नका! – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

102

१ मे पासून देशभरात १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यास सुरुवात होणार आहे. देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे जेवढे उत्पादन होणार आहे, त्यातील अर्धा हिस्सा हा राज्यांना दिला जाणार आहे. लसीकरणाची व्याप्ती वाढवली जाणार असल्याने सर्व श्रमिकांना मोफत लस मिळणार आहे. राज्यांनी तसा विश्वास श्रमिकांना द्यावा आणि त्यांनी स्थलांतरित होऊ नये, ते जिथे आहेत तिथेच राहावे, त्यांना लस मिळेल आणि त्यांचे कामही बंद होणार नाही. राज्यांना आवाहन करतो कि, त्यांनी लॉकडाऊनवर अवलंबून राहू नये त्याऐवजी मायक्रो काँटेन्मेन्ट झोनकडे लक्ष द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधताना केले.

अफवा पसरणार नाही हे पहा! 

देश कोरोनाविरोधातील लढाई धैर्याने लढत आहे. अनुशासन आणि धैर्याची ही लढाई आहे. जनभागीदाराच्या साहाय्याने आपण ही लढाई नक्की जिंकू. त्यासाठी अधिकाधिक सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा, सेवा संकल्पाच्या जोरावर ही लढाई आपण लढू. युवा वर्गाला मी आवाहन करतो कि, त्यांनी त्यांच्या भागात छोट्या छोट्या कमिटी तयार कराव्यात आणि कोविड नियमांचे पालन होते का, हे पहावे. त्याचबरोबर बालमित्रांनी मागील काळात स्वच्छतेविषयी जनजागृती केली होती. तसेच आता घरातील मंडळींना अनावश्यक घराबाहेर पडू देऊ नये. प्रसारमाध्यमांनीही कोविड नियमांचे पालन व्हावे यासाठी जनजागृती करावी आणि भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, तसेच अफवा पसरणार नाही याकडे लक्ष द्यावे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

(हेही वाचा : मुंबईत मंगळवारी दिवसभरात ७३८१ रुग्ण, ३५ रुग्णांचा मृत्यू!)

देशभरात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होईल!

कोरोनाच्या पहिल्या लाटेत देश सांभाळला आहे, आता दुसरी लाट आली आहे. या लाटेत देशवासीयांनी त्यांच्या आप्तस्वकीयांना गमावले. त्यांच्या प्रति मी संवेदना व्यक्त करतो. तसेच या लढाईत सर्व आरोग्य सेवक धैर्याने कार्य करत आहेत. त्यांचेही आभार मानतो. कोणत्याही कठीण परिस्थितीला आपण खंबीरपणे सामोरे गेले पाहिजे. देशात यावेळी ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्याचा पुरवठा देशभरात सुरळीत होईल, त्यासाठी देशभरात नवीन ऑक्सिजन प्लांट उभे करणे, १ लाख सिलिंडरचे वितरण करणे, ऑक्सिजन रेल्वे सुरु करणे अशी उपाययोजना केली आहे. तसेच औषध कंपन्यांनीही उत्पादन वाढवले आहे. देशात खाटांची संख्याही वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. जगात पहिल्यांदा जेव्हा कोरोना पसरला तेव्हा देशातील शास्त्रज्ञांनी त्यावर लस शोधण्यास सुरुवात केली आणि अथक प्रयत्नाने भारतीय बनावटीच्या २ लसींची निर्मिती केली. तीही स्वस्त आणि अधिक दर्जेदार आहे. सध्या १२ कोटी जनतेचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यातही आरोग्य क्षेत्रात कार्यरत बहुतांश कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.