- प्रतिनिधी
संविधानाच्या गौरवशाली 75 वर्षानिमित्त आयोजित चर्चेत सहभागी होती पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसच्या दिखाऊपणाचा बुरखा फाडला. लोकांनी रसातळाला पोहचविल्यानंतर काँग्रेसला आता संविधानाचा पुळका आला आहे. मात्र याच काँग्रेसने सत्तेसाठी वारंवार घटना बदलली, असा खुलासा पंतप्रधान मोदी यांनी केला. काँग्रेसच्या तोंडाला संविधान बदलण्याचे रक्त लागले असल्याचा आरोपही पंतप्रधान मोदींनी केला. लोकसभेत घटनेवर दोन दिवसांपासून चर्चा सुरु आहे. चर्चेचा शनिवार दुसरा दिवस होता. संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संसदेत चर्चा आयोजित करण्यात आली आहे. राज्यसभेत सोमवार आणि मंगळवारी चर्चा होणे आहे. लोकसभेतील चर्चेला उत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसचा खरा चेहरा पुढे आणला.
(हेही वाचा – सनातन संस्थेच्या वतीने Datta Jayanti च्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शनांच्या माध्यमांतून अध्यात्मप्रसार !)
काँग्रेस सत्तेसाठी एवढी हपापलेली होती की काँग्रेसने वारंवार घटनादुरुस्ती करीत राहिली. राज्यघटनेच्या आत्म्यावर वारंवार हल्ला केला. काँग्रेसच्या 60 वर्षाच्या काळात घटना 75 वेळा बदलण्यात आली असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, नेहरूजींनी त्यावेळी एक पत्र लिहिले होते. संविधान आपल्या मार्गात येत असेल तर कोणत्याही परिस्थितीत राज्यघटना बदलली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचा नेहरू यांना विरोधीही केला होता. आचार्य कृपलानी, जयप्रकाश नारायण यांसारख्या मोठ्या व्यक्तींनीही ते चुकीचे ठरवले. पण नेहरूंनी सर्वांची मते डावलून घटना बदलत राहिले.
(हेही वाचा – BMC : मुंबईतील बांधकामांच्या ठिकाणी धुळीने माखलेले बॅरिकेड्स महापालिका पाण्याने धुणार)
काँग्रेसच्या एका कुटुंबाने संविधानाच्या आत्म्यावर वार करण्याची कोणतीही कसर सोडली नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले. देशाच्या प्रदीर्घ इतिहासात एकाच कुटुंबाने राज्य केले आहे. या घराण्यातील वाईट विचार, वाईट कृत्ये आणि कुकर्मांची परंपरा चालू आहे. या कुटुंबाने राज्यघटनेला प्रत्येक स्तरावर आव्हान दिले आहे. 1947 ते 1952 पर्यंत या देशात निवडून आलेले सरकार नव्हते. तात्पुरती व्यवस्था होती, निवडक सरकार होते. निवडणुका झाल्या नाहीत. अंतरिम व्यवस्था म्हणून ब्लू प्रिंट तयार करण्यात आली होती. 1952 पूर्वी राज्यसभेची स्थापना झाली नव्हती. सार्वजनिक व्यवस्था नव्हती. संविधान निर्मात्यांनी नुकतीच राज्यघटना तयार केली होती. अशात काँग्रेसने काय केले तर अध्यादेश काढून संविधान बदलले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला गेला. हा देखील संविधान निर्मात्यांचा अपमान होता. मात्र त्याला तेथे यश आले नाही. पुढे संधी मिळताच त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला. संविधान सभेत त्यांना जे जमले नाही ते त्यांनी मागच्या दाराने केले. निवडून आलेल्या सरकारचे जे नेते नव्हते त्यांनी हे केले, असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community