जय भीम म्हणणे काँग्रेसची मजबुरी; PM Narendra Modi यांचा गंभीर आरोप

37
जय भीम म्हणणे काँग्रेसची मजबुरी; PM Narendra Modi यांचा गंभीर आरोप
  • प्रतिनिधी

काँग्रेसने आता पर्यंत फक्त कुटुंबासाठी काम केले आहे. काँग्रेसला देशातील गरीब जनते विषयी काही वाटत नाही. मोदी सरकारची यशस्वी वाटचाल बघून त्यांच्या नेत्यांना संविधान, हातात घ्यावे लागले. खरं तर सत्ता मिळविण्यासाठी जय भीम म्हणणे काँग्रेसची मजबुरी असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राज्यसभेत बोलताना केला.

(हेही वाचा – Old Tax Regime : येत्या २-३ वर्षांत नवीन कर रचना रद्दबादल होण्याचे अर्थ मंत्रालयाचे संकेत)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना काँग्रेसवर चांगलेच तोंडसुख घेतले. खरं तर जातीवादापासून प्रत्येकाच्या विकासापर्यंत कॉंग्रेसने बाबासाहेबचा द्वेष केला आहे, असा आरोप काँग्रेसवर करताना पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi)  यांनी कॉंग्रेसवर आरोप केला की, कॉंग्रेसने राजकारणाचे एक मॉडेल तयार केले होते. ज्यात खोटे, कपट, भ्रष्टाचार कौटुंबिकता होती. कॉंग्रेस मॉडेलमध्ये ‘फॅमिली फर्स्ट’ हे धोरण होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) आणीबाणीपासून ते देवानंदच्या चित्रपटापासून, दूरदर्शनपर्यंतच्या सर्व मुद्द्यांविषयी चर्चा करून विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच, संसदेत पंतप्रधान मोदींची काव्य शैली देखील चर्चेची बाब होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.