पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. पंडित दीनद्याल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त भोपाळमध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने जंबुरी मैदान येथे पंतप्रधान मोदी यांनी १० लाख भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली. “काँग्रेस म्हणजे गांजलेले लोखंड” असं मोदी म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
काँग्रेस हे गंजलेले लोखंड (PM Narendra Modi) आहे. ते ज्या राज्यात जातात त्या राज्यची नासधूस करतात. त्यांच्याकडे भविष्याचा विचार नाही. विकासाच्या प्रत्येक कामावर काँग्रेस टीका करते. भारताचे यश काँग्रेसला आवडत नाही. काँग्रेसला देशाला पुन्हा विसाव्या शतकात घेऊन जायचे आहे. अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
(हेही वाचा – Chandrasekhar Bawankule : ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर बावनकुळे यांनी दिलं स्पष्टीकरण)
कांग्रेस पहले बर्बाद हुई, फिर बैंकरप्ट हुई और अब उसने पार्टी को चलाने का ठेका अर्बन नक्सलियों को ही दे दिया है। कांग्रेस में अब अर्बन नक्सलियों की ही चल रही है। pic.twitter.com/9glMYeJkE5
— Narendra Modi (@narendramodi) September 25, 2023
पुढे बोलतांना मोदी म्हणाले की; मध्य प्रदेशातील काँग्रेस राजवटीचे (PM Narendra Modi) वैशिष्टय म्हणजे रणनीती, कोट्यवधींचा भ्रष्टाचार आणि गैरकारभार होता. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने मध्य प्रदेशात अनेक वर्ष राज्य केले मात्र संसाधनांनी समृद्ध मध्य प्रदेशला काँग्रेसने आजारी बनवले. काँग्रेसला जिथे संधी मिळाली तिथे त्यांनी नासधूस केली. आगामी काही वर्षे मध्य प्रदेशासाठी अतिशय महत्वाची आहेत. मध्य प्रदेशला विकसित बनवण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे आगामी निवडणूका अत्यंत महत्वाच्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community