सध्या काँग्रेससह समविचारी पक्ष देशात जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करत आहेत. त्यावर सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता यावर जोरदार प्रहार केला आहे. काँग्रेसला हिंदूंमध्ये फूट पडायची आहे, अशा शब्दांत PM Narendra Modi यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
PM Narendra Modi हे छत्तीसगडच्या जंगलपूर येथील दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी बस्तरमधील दंतेश्वरी देवीच्या मंदिरात पूजा करून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सभेला संबोधित करताना जातीनिहाय जनगणनेच्या मुद्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. याआधी काँग्रेस म्हणायची की, देशातील साधनसंपत्तीवर पहिला अधिकार हा अल्पसंख्याक आणि मुस्लिम यांचा आहे. पण आता लोकच ठरवतील पहिला अधिकार कुणाचा असेल. काँग्रेसला गरीबांमध्ये फूट पडायची आहे. परंतु माझ्यासाठी गरीब ही सर्वात मोठी जात आहे. गरीब ही श्रेणी जरी सामान्य श्रेणी असली तरी माझ्यासाठी गरीब हा सर्वांपेक्षा वरच्या श्रेणीतील आहे. काँग्रेसला लोकांमध्ये दरी निर्माण करायची आहे. काँग्रेसने देशाचे तुकडे करण्याचे काम केले आहे. देश उद्धवस्त करायचा आहे. सध्या काँग्रेस पक्ष हा त्यांचे नेते चालवत नसून या पक्षात अनुभवी नेत्यांचे मत जाणून घेतले जात नाही. देशविरोधी घटकांशी काँग्रेस पक्ष हातमिळवणी करत आहे. लोकांच्या भावनांशी खेळत आहेत. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या या नव्या षडयंत्रापासून लोकांनी सावध राहायला हवे, असेही PM Narendra Modi म्हणाले.
(हेही वाचा Google Chromebook : गूगल भारतात क्रोमबुक बनवणार, आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडून कौतुक )
Join Our WhatsApp Community