पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे नेतृत्व करत असल्यापासून संसदेत त्यांचाच बोलबाला असतो. कारण त्यांच्यातील उत्तम वकृत्व विरोधकांना नामोहरम करत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी काव्य रूपातून विरोधकांवर करत असलेली टीका मार्मिक ठरते आहे साधारण अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण करताना पंतप्रधान मोदी यांचे कलागुण दिसून येत आहेत. विशेष म्हणजे २०१६ सालापासून २०२३ पर्यंत पंतप्रधान मोदी यांनी त्या त्या प्रसंगरूपाने कविता म्हटली आहे. त्या मतितार्थातून पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसचे चांगलेच कान टोचले आहेत.
९ मार्च २०१६ साली पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर संसदेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना विरोधकांपैकी अनेकांना एकप्रकारे भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर कवितेच्या माध्यमातून दिली होती. २०१४ साली मोदी लाटेतून देशभरात विरोधी पक्षांचा सुफडासाफ झाला होता, त्यावेळी अनेक जण भाजपामध्ये प्रवेश करण्याचा विचार करत होते. त्यांच्या भावना ओळखून मोदी यांनी कवी निदा फाजली यांची कविता म्हटली.
सफ़र में धूप तो होगी जो चल सको तो चलो सभी हैं भीड़ में तुम भी निकल सको तो चलो
इधर उधर कई मंज़िल हैं चल सको तो चलो बने बनाये हैं साँचे जो ढल सको तो चलो
किसी के वास्ते राहें कहाँ बदलती हैं तुम अपने आप को ख़ुद ही बदल सको तो चलो
यहाँ किसी को कोई रास्ता नहीं देता मुझे गिराके अगर तुम सम्भल सको तो चलो
यही है ज़िन्दगी कुछ ख़्वाब चन्द उम्मीदें इन्हीं खिलौनों से तुम भी बहल सको तो चलो
(हेही वाचा प्रश्नपत्रिका फोडली तर १ कोटींचा दंड, १० वर्षांचा तुरुंगवास; ‘या’ राज्यात होणार कायदा)
७ फेब्रुवारी २०१९ रोजीही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी संसदेत कवी सर्वेश्वर दयाळ सक्सेना यांची कविता म्हटली. त्यामधूनही त्यांनी एकप्रकारे देश चालविण्यासाठी जो दृढ निश्चय केला आहे, त्याचे प्रतिपादन केले. देशाची प्रगती करताना आपण हे जणू आयुष्याचे लक्ष्य ठरवले आहे, हे मोदी यांनी सुचवले होते.
सूरज जाएगा भी तो कहां उसे यहीं रहना होगा यहीं हमारी सांसों में हमारी रगों में हमारे संकल्पों में हमारे रतजगों में तुम उदास मत होओ अब मैं किसी भी सूरज को नहीं डूबने दूंगा।
२५ फेब्रुवारी २०१९ रोजीही पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी कवी देवेंद्र शर्मा देव यांची कविता म्हटली, ज्यामध्ये त्यांनी देश चालवताना त्यांच्यामध्ये किती आत्मविश्वास आहे, याचा प्रत्येय देशवासियांना दिला. एका वाक्याच्या शायरीमधून त्यांनी स्पष्ट केले, ते म्हणाले, ‘जब हौसला बना लिया ऊंची उड़ान का, फिर देखना फिजूल है कद आसमान का’
(हेही वाचा मुंबईतील २२७ विभागांमध्ये गुंजणार वीर सावरकर लिखित शिवरायांची आरती)
७ फेब्रुवारी २०२२ रोजी पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय भाषणात बोलताना काँग्रेसच्या त्यावेळेच्या नेतृत्वाला चुका दाखवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस नेतृत्वाला चुका दाखवल्या तरी नेतृत्व स्वीकारण्याच्या भूमिकेत नाही, असे पंतप्रधान मोदी यांना सुचवायचे असावे.
वो जब दिन को रात कहें तो तुरंत मान जाओ नहीं मानोगे तो वो दिन में नकाब ओढ़ लेंगे जरूरत हुई तो हकीकत को थोड़ा बहुत मरोड़ लेंगे वो मगरूर हैं खुद की समझ पर बेइंतेहा उन्हें आईना मत दिखाओ, वो आईने को ही तोड़ देंगे
३ फेब्रुवारी २०२३ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर अभिनंदन प्रस्तावावर बोलताना कवी दृष्यंत तिवारी यांच्या कवितेची एक ओळ म्हटली. यातून पंतप्रधान मोदी यांनी थेट राहुल गांधी यांच्या अवगुणांवर टीका केली. राहुल गांधी यांचे व्यक्तिमत्व मनमौजी आहे, जे गांभीर्यपूर्ण नाही, असे अधोरेखित केले, ते म्हणाले, ‘ये कह के हम दिल को बहला रहे हैं, वो अब चल चुके हैं, वो अब आ रहे हैं.’
याच भाषणात काँग्रेसची खिल्ली उडवताना पंतप्रधान मोदी म्हणाले,
‘तुम्हारे पांव के नीचे कोई जमीन नही, फिर भी कमाल ये है उसपर तुम्ही यकिन नही’
या अधिवेशनात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर बेछूट आरोप केले, त्याचाही समाचार घेताना पंतप्रधान मोदी म्हणाले,
“कीचड़ उसके पास था, मेरे पास गुलाल। जो भी जिसके पास था, उसने दिया उछाल…जितना कीचड़ उछालोगे, कमल उतना ही खिलेगा।”
Join Our WhatsApp Community