पंतप्रधान मोदींसह प्रमुख नेत्यांनी दिल्या विजयादशमीच्या शुभेच्छा!

171

देशभरात विजयादशमीचा उत्साह पहायला मिळत आहे. यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही प्रमुख नेत्यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

( हेही वाचा : वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात! ५ जणांचा मृत्यू; रस्ता वाहतुकीसाठी बंद )

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत दिल्या शुभेच्छा…

विजयाचे प्रतीक असलेल्या विजयादशमीच्या सर्व देशवासीयांना खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात धैर्य, संयम आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येवो अशी माझी इच्छा आहे असे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे.

 

विजयादशमी निमित्त राज्यपालांनी दिल्या शुभेच्छा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विजयादशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीचा सण दुष्प्रवृत्ती वरील सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सत्याचा नेहमीच विजय होतो, हा संदेश या सणाच्या माध्यमातून अधोरेखित होतो. यंदाची विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, आरोग्य व भरभराट घेऊन येवो या अपेक्षेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

विजया दशमीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

विजयादशमीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीच्या पावनपर्वात समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा आणि चांगल्या प्रवृत्तीचे सृजन व्हावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, विजयादशमी हा आपल्या संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचा सण आहे. लोकभावनेला अभिव्यक्त करण्यात आपल्या सणांचे खूप मोठे योगदान आहे. विजयादशमी हा सण समाजातील चांगुलपणाचा, मांगल्याचा तसेच दुष्ट प्रवृत्ती आणि अवगुणावर विजय आहे. या पावनपर्वानिमित्त समाजात चैतन्याला उधाण येते. राज्यातील जनतेला सुख-समृद्धी लाभावी तसेच यानिमित्ताने दुःख, नकारात्मकता यांचे सीमोल्लंघन होऊन आनंद व सकारात्मकता सर्वांना लाभावी.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.