PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा असा असणार पुणे दौरा

154

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी, १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मंगळवारी सकाळी ११ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. सकाळी ११.४५ वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यानंतर, दुपारी १२:४५ वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.

पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पुणे मेट्रो टप्पा १ चे काम पूर्ण झालेल्या फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या दोन मार्गिकांचे उद्घाटन करणार आहेत. सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्तीच्या ध्येयाकडे वाटचाल करत, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेली १२८० हून अधिक घरे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरीत करण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेली २६५० हून अधिक घरे देखील पंतप्रधान हस्तांतरित करणार आहेत. त्यांनतर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणाऱ्या सुमारे ११९० घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या ६४०० हून अधिक घरांची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

(हेही वाचा Sanjay Raut : शरद पवारांच्या भूमिकेवर संजय राऊतांची नाराजी; म्हणाले ‘संभ्रम निर्माण करू नका’)

पंतपधान नरेंद्र मोदी पुणे दौरा  

  • एक ऑगस्ट – सकाळी १०.१५ लोहगाव विमानतळावर आगमन
  • सकाळी १०.४० कृषि महाविघालयाच्या मैदानवरील हेलिपॅडवर आगमन
  • सकाळी १०.५५ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन
  • सकाळी ११ तेे ११. ३० वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात पुजा
  • सकाळी ११ .४५ वाजता लोकमान्य टिळक पुरस्कारः स. प. महाविद्यालय (कार्यक्रम निमंत्रितांसाठी)
  • दुपारी १२.४५ वाजता मेट्रोच्या दोन विस्तारित मार्गांचे लोकार्पण, पंतप्रधान आवास योजनेतील पुणे आणि पिंपरीतील चार हजार सदनिकांचे लोकार्पण,  पीएमआरडीएच्या सहा हजार घरांचे भूमिपूजन (खुला कार्यक्रम)
  • दुपारी १.४५ ते २.१५ राखीव
  • दुपारी २.२५ कृषि महाविघालयाच्या मैदानवरील हेलिपॅडवर आगमन
  • दुपारी २. ५५ वाजता दिल्लीकडे प्रस्थान
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.