देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात भाजपला सत्ता मिळाली आहे. तेव्हा या पराभवाचा राग विरोधकांनी संसदेत काढू नये असा टोला (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज म्हणजेच सोमवार ४ डिसेंबर पासून सुरुवात झाली. तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना पंतप्रधानांनी असे विधान केले आहे.
नेमकं काय म्हणाले मोदी ?
निवडणुकीत ज्यांचा पराभव झाला आहे, त्यांनी संसदेत त्यांचा राग दाखवू नका. लोकशाहीमध्ये पक्ष आणि विपक्ष समान आहे. राजकारणात जनतेचे हित विसरू नका. हा निवडणुकीचा निकाल सकारात्मक पद्धतीने जनतेसमोर आणा, असे आवाहन (PM Narendra Modi) पंतप्रधानांनी केले आहे. तसेच पंतप्रधान म्हणाले की, चांगल्या जनादेशानंतर आम्ही संसदेच्या मंदिरात भेटत आहोत. मी सर्व खासदारांना सकारात्मक विचार घेऊन संसदेत यावे, असे आवाहन करतो. बाहेरच्या पराभवाचा राग संसदेत आणू नका. लोकशाहीच्या मंदिराला स्टेज बनवू नका. देशाला सकारात्मकतेचा संदेश द्यावा असे मोदींनी (PM Narendra Modi) सांगितले.
(हेही वाचा – Maharashtra Congress मधील एक गट फुटीच्या मार्गावर?)
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवार ४ डिसेंबर पासून सुरुवात झाली असून हे आगामी २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. १७ व्या लोकसभेचे हे १४ वे अधिवेशन असेल आणि स्वातंत्र्यानंतरचे २६२ वे अधिवेशन असेल. यामध्ये १९ विधेयके आणि २ आर्थिक बाबींवर चर्चा होणार आहे. हिवाळी अधिवेशनात आयपीसी, सीआरपीसी आणि पुरावा कायदा बदलणारी तीन महत्त्वाची विधेयके संमत करण्यावर विचार केला जाऊ शकतो. एकूण १९ दिवस चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनात १५ बैठका होणार आहेत. तसेच टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील आरोपांची चौकशी केल्यानंतर एथिक्स समितीचा अहवाल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभापतींना सादर केला जाणार आहे. (PM Narendra Modi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community