सीमावर्ती गावांच्या विकासाकडे यापूर्वी दुर्लक्ष झाले. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्हे, तर देशाच्या गरजेनुसार काम करण्याची आपली शैली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले. आपल्या पुढील कार्यकाळात अभियांत्रिकी कौशल्याचा नमुना असलेल्या या ठिकाणी भेटायला येऊ, असे त्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांना वचन दिले.
(हेही वाचा – Telangana : काँग्रेस शासित तेलंगणात पूजा करण्यासाठी गेलेल्या हिंदूंवर पोलिसांचा लाठीचार्ज)
सेला बोगद्याचे लोकार्पण :
अरुणाचल प्रदेश मधील इटानगर येथे विकसित भारत विकसित ईशान्य प्रदेश कार्यक्रमादरम्यान दूरदृश्य प्रणालीद्वारे सेला बोगद्याचे लोकार्पण केले. उद्घाटन समारंभाला अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते. हा बोगदा सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील तवांगला आसामच्या तेजपूरशी जोडणाऱ्या रस्त्यावर १३ हजार फूट उंचीवर बांधला आहे. एकूण ८२५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला हा बोगदा बलीपारा – चरिदुआर – तवांग रोडवरील सेला खिंड ओलांडून तवांगला सर्व ऋतूंमध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान करेल, सशस्त्र दलांची सज्जता वाढवेल आणि सीमावर्ती भागाच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देईल. (PM Narendra Modi)
(हेही वाचा – India – China : भारताकडून पूर्व लडाख सीमेवर आणखी १० हजार सैनिक तैनात)
काय म्हणाले नरेंद्र मोदी ?
आपल्या भाषणात, पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) ईशान्य क्षेत्राच्या विकासाप्रति सरकारची अतूट वचनबद्धता व्यक्त केली . ते म्हणाले की सेला बोगदा सर्व ऋतूंमध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि तवांगच्या लोकांसाठी प्रवास सुखकर करेल. ईशान्य प्रदेशात अनेक बोगद्यांचे काम सुरू आहे असे ते म्हणाले.
Several people across Assam got their own homes today. Our government will keep working to further ‘Ease of Living’ for everyone. pic.twitter.com/OU0CrIhnj3
— Narendra Modi (@narendramodi) March 9, 2024
सेला बोगदा प्रकल्प देशासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा :
सेला बोगदा नवीन ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धती वापरून बांधण्यात आला आहे आणि त्यात सर्वोच्च मानकांची सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. हा प्रकल्प या प्रदेशात केवळ जलद आणि अधिक कार्यक्षम वाहतूक मार्ग प्रदान करणार नाही तर देशासाठी सामरिकदृष्ट्या देखील तो महत्त्वाचा आहे. (PM Narendra Modi)
(हेही वाचा – पंतप्रधान मोदींचा अपमान; Maldives च्या अर्थव्यवस्थेला फटका; भारतीय पर्यटकांच्या संख्येत 33% घट
बोगदा अवघ्या पाच वर्षांत बांधून पूर्ण :
बोगद्याची पायाभरणी पंतप्रधानांच्या (PM Narendra Modi) हस्ते ९ फेब्रुवारी २०१९ रोजी करण्यात आली आणि १ एप्रिल २०१९ रोजी बांधकामाला सुरुवात झाली. कठीण भूप्रदेश आणि प्रतिकूल हवामानासारख्या आव्हानांवर मात करून हा बोगदा अवघ्या पाच वर्षांत बांधून पूर्ण झाला आहे. सीमावर्ती भागाच्या विकासात बीआरओ नेहमीच आघाडीवर राहिले आहे. गेल्या तीन वर्षांत, बीआरओ ने ८,७३७ कोटी रुपये खर्चून विक्रमी ३३० पायाभूत सुविधा प्रकल्प बांधून पूर्ण केले आहेत. (PM Narendra Modi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community