पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवार २२ मार्च थिम्पू येथे भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांची भेट घेतली. मोदी यांच्या सन्मानार्थ आयोजित औपचारिक भोजनाच्या वेळी त्यांनी संवाद साधला. पारो ते थिंपू या संपूर्ण प्रवासात भूतानवासीयांनी मोदी यांना शुभेच्छा दिल्या. या अभूतपूर्व स्वागताबद्दल पंतप्रधानांनी तोबगे यांचे आभार मानले.
(हेही वाचा – IPL 2024 : सलामीच्या सामन्यात चेन्नईची बंगळुरूवर ६ गडी राखून मात )
द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा :
दोन्ही नेत्यांनी (PM Narendra Modi) बहुआयामी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली आणि नवीकरणीय ऊर्जा, कृषी, युवा देवाणघेवाण, पर्यावरण आणि वनीकरण तसेच पर्यटन यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यासंदर्भात सामंजस्य तयार केले. भारत आणि भूतानमध्ये दीर्घ काळापासून सर्व स्तरांवर अत्यंत विश्वासाचे, सद्भावनेचे आणि परस्पर सामंजस्याचे वैशिष्ट्यपूर्ण आणि अपवादात्मक संबंध आहेत. (PM Narendra Modi)
अनेक सामंजस्य करार :
बैठकीपूर्वी दोन देशांत ऊर्जा, व्यापार, डिजिटल कनेक्टिव्हिटी, अंतराळ, कृषी अशा विविध क्षेत्रातले अनेक सामंजस्य करार दोन्ही पंतप्रधानांच्या (PM Narendra Modi) उपस्थितीत झाले.
(हेही वाचा – Moscow Terrorist attack : हल्ल्यात ७० जणांचा मृत्यू तर १५० जण जखमी)
पंतप्रधानांनी भूतानच्या राजांची घेतली भेट :
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी थिम्पू येथे भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतली. पारो ते थिंपू या संपूर्ण प्रवासात लोकांनी पंतप्रधानांचे स्वागत केले ,भूतानच्या लोकांकडून झालेल्या या अनोख्या स्वागताबद्दल पंतप्रधानांनी राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे आभार मानले.
I am honoured by the special gesture by His Majesty the King of Bhutan, Jigme Khesar Namgyel Wangchuck of coming to the airport as I leave for Delhi.
This has been a very special Bhutan visit. I had the opportunity to meet His Majesty the King, PM @tsheringtobgay and other… pic.twitter.com/OFJ4y2w0FJ
— Narendra Modi (@narendramodi) March 23, 2024
(हेही वाचा – स्वातंत्र्य चळवळीत ‘हमारा संग्राम’ नावाचे साप्ताहिक संपादित करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक Subhadra Joshi)
… आणि पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली :
भारत-भूतान (PM Narendra Modi) मधील घनिष्ठ मैत्रीपूर्ण आणि अनोख्या संबंधाबद्दल पंतप्रधान आणि भूतानचे राजे यांनी समाधान व्यक्त केले. उभय देशांमध्ये मैत्री आणि सहकार्याचे दृढ संबंध निर्माण करण्याच्या दृष्टीने ड्रुक ग्याल्पो पुरस्काराने दिलेल्या मार्गदर्शक दृष्टीकोनाबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community