पंतप्रधानांनी महाराष्ट्राविषयी व्यक्त केली चिंता! काय म्हणाले? वाचा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रासह केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोनाच्या परिस्थितीविषयी संवाद साधला.

65

सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जाताना देशात तिसऱ्या लाटेची चिन्हे दिसू लागली आहेत. पहिली लाट ओसरल्यावर काही प्रमाणात सर्वसामान्यांचे जीवनमान बिनधास्त बनले, त्याचा परिणाम म्हणून कोरोनाची दुसरी लाट इतकी भयंकर आली कि, त्यासमोर पहिली लाट काहीच नव्हती. आत तिसऱ्या लाटेची चिन्हे दिसू लागली आहेत, त्यामुळे त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या लाटेचा अधिक धोका असलेल्या सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलताना पंतप्रधांन मोदी यांनी तिसरी लाट येण्याआधीच ती कशी राखायची, यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना केली.

देशाच्या जवळपास सर्वच राज्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. त्यातील काही राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रासह केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या चर्चेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार हे देखील उपस्थित होते.

(हेही वाचा : मुंबईकरांनो आता ऑनलाईन गाड्या पार्क करा! या भागांत होणार सुरुवात)

काय म्हणाले पंतप्रधान? 

  • ज्या राज्यांमधून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली, तिथली परिस्थिती आधी नियंत्रणात येईल. मात्र, महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. ही आपल्या सर्वांसाठी आणि देशासाठीही गंभीर चिंतेची बाब आहे.
  • देशातले ८० टक्के कोरोनाबाधित हे याच सहा राज्यांमधले आहेत. तसेच ८४ टक्के मृत्यूही याच राज्यांमध्ये झाले आहेत. ही चिंताजनक बाब आहे.
  • ज्या राज्यांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे, त्या राज्यांनी जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक उपाय करुन कोरोनाची तिसरी लाट सुरुवातीपासूनच रोखायला हवी. कारण जशी रुग्णवाढ होते, तसा हा विषाणू आपली रुपे बदलत आहे. अधिक धोकादायक होत आहे.
  • कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आधीपासून जी रणनीती अवलंबली, आत्ताही तेच करायचे आहे.
  • टेस्ट, ट्रॅक, ट्रिट आणि आता लस…याच रणनीतीच्या आधारावर आपल्याला पुढे जायचे आहे. तसेच ग्रामीण भागावर जास्त लक्ष केंद्रीत करायला हवे. तसेच मायक्रो कंटेनमेंट झोनवर अधिक लक्ष द्यायला हवे. त्याचबरोबर संसर्ग जास्त असलेल्या भागांमध्ये चाचण्या जास्तीत जास्त वाढवायला हव्यात आणि लसीचा वापर करोनाशी लढण्याचे एक अस्त्र म्हणून करायचा आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे? 

  • कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने धार्मिक, सामाजिक कारणे तसेच राजकीय कार्यक्रम, आंदोलने यामुळे विविध ठिकाणी होणारी गर्दी थांबविण्यासाठी केंद्र सरकारनेच आता देशपातळीवर एक व्यापक धोरण आणावे.
  • महाराष्ट्रात रुग्ण संख्या आणि मृत्यू दर कमी होत असला तरी आणखीही कमी होण्याची गरज आहे. फ्रंट लाईन वर्कर्सचे लसीकरणही वेगाने पूर्ण करीत आहोत, लसी वाया जाण्याचे प्रमाणही कमी केले आहे.
  • रुग्ण संख्या घटत असली तरी पूर्णपणे कमी झालेली नाही. केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर सर्वच ठिकाणी लोक घराबाहेर पडत आहेत, गर्दी करत आहेत. रिव्हेंज टुरिझम, रिव्हेंज शॉपिंग सुरु झाले आहे. यावर आळा घालावा लागेल.
  • कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असून उद्योगांना फटका बसू न देण्यासाठी तशा उपाययोजना करण्यात येत आहेत.
  • राज्याला जास्तीत जास्त लसींचे डोसेस मिळावे, महत्वाच्या औषधांच्या किमती नियंत्रित कराव्यात तसेच कोविडोत्तर उपचारांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची केंद्रे सुरु करण्यासाठी केंद्राने मदत करावी.

(हेही वाचा : मुंबईत तलाव भरण्याचा श्रीगणेशा झाला… ‘हे’ तलाव भरले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.