लेक्स फ्रिडमॅनसोबतच्या पॉडकास्टमध्ये PM Narendra Modi यांनी RSS विषयी व्यक्त केली कृतज्ञता; म्हणाले, ‘संघाने मला संस्कार आणि आयुष्याला दिशा दिली’

पंतप्रधान मोदींनी प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्याशी दीर्घ चर्चा केली. या पॉडकास्टमध्ये मोदींनी त्यांचे बालपण, हिमालयात घालवलेला वेळ आणि सार्वजनिक जीवनातील प्रवास याबद्दल उघडपणे चर्चा केली.

26
लेक्स फ्रिडमॅनसोबतच्या पॉडकास्टमध्ये PM Narendra Modi यांनी RSS विषयी व्यक्त केली कृतज्ञता; म्हणाले, ‘संघाने मला संस्कार आणि आयुष्याला दिशा दिली’
लेक्स फ्रिडमॅनसोबतच्या पॉडकास्टमध्ये PM Narendra Modi यांनी RSS विषयी व्यक्त केली कृतज्ञता; म्हणाले, ‘संघाने मला संस्कार आणि आयुष्याला दिशा दिली’

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन (Lex Fridman) यांच्यातील पॉडकास्ट १६ मार्चला प्रसिद्ध करण्यात आला आहे. या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची भूमिका, त्यांचे समाजातील योगदान आणि वैयक्तिक अनुभव…याविषयी ते बोलले आहेत.

प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन (American podcaster Lex Friedman) यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पॉडकास्टवर (podcast) संवाद साधला. फ्रीडमन यांनी याचे फोटो शेअर करून माहिती दिली. लेक्स फ्रिडमन (Lex Friedman) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, ‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत माझा ३ तासांचा ऐतिहासिक पॉडकास्ट संवाद झाला. ते माझ्या आयुष्यातील सर्वात प्रभावी संभाषणांपैकी एक आहे. तसेच या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बालपण, हिमालयात घालवलेला वेळ आणि सार्वजनिक जीवनातील त्यांचा प्रवास यासह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली आहे.   (PM Narendra Modi)

लेक्स फ्रिडमनच्या या पोस्टनंतर पंतप्रधान मोदींनीही प्रतिक्रिया दिली. पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी लिहिले की, ‘लेक्स फ्रिडमन यांच्याशी झालेली ही खरोखरच एक आकर्षक चर्चा होती, ज्यामध्ये आम्ही विविध विषयांवर चर्चा केली. त्यात माझ्या बालपणीच्या आठवणी, हिमालयमधील प्रवास आणि सार्वजनिक जीवनातील माझा प्रवास यांचा समावेश होता. तुम्ही सुद्धा या पॉडकास्टचा भाग व्हा. असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना केले.

(हेही वाचा – Congress ने छत्रपतींच्या बदनामीचे काम केले; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा हल्लाबोल)

आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दल बोलण्याव्यतिरिक्त, पॉडकास्टच्या भागात पंतप्रधान मोदींचे एआय आणि मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया सारख्या मोहिमांबद्दलचे मत घेण्यात आले आहे. तसेच लेक्स फ्रिडमन यांनी पंतप्रधान मोदींच्या आध्यात्मिक बाजूवरही प्रकाश टाकला आहे. पॉडकास्टर फ्रिडमन म्हणाले की, नरेंद्र मोदी हे सर्वात आकर्षक व्यक्तींपैकी एक आहेत. फ्रीडमन यांनी यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प, एलोन मस्क, मार्क झुकरबर्ग, जेफ बेझोस आणि व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासह अनेक शक्तिशाली लोकांसोबत पॉडकास्टिंग केले आहे. तसेच गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, फ्रीडमन यांनी पंतप्रधान मोदींना भेटण्याबद्दल उत्साह व्यक्त केला होता.

‘संघाकडून मला संस्कार मिळाले’
आमच्याकडे भारतीय मजदूर संघ आहे. त्याच्या सुमारे 50,000 युनियन आहेत, ज्यांचे देशभरात लाखो सदस्य आहेत. कदाचित प्रमाणाच्या बाबतीत जगात यापेक्षा मोठी कामगार संघटना नाही. पण ते कोणत्या प्रकारचा दृष्टिकोन स्वीकारतात ही मनोरंजक गोष्ट आहे. ऐतिहासिकदृष्ट्या डाव्या विचारसरणीने जगभरातील कामगार चळवळीला चालना दिली. त्यांची घोषणा काय आहे? ‘जगातील कामगारांनो, एक व्हा.’ RSS प्रशिक्षित स्वयंसेवकांनी चालवलेल्या कामगार संघटना कशावर विश्वास ठेवतात? ते म्हणतात, कामगारांनी जग एकत्र केले आहे. इतर म्हणतात, ‘जगातील कामगार एक व्हा’ आणि आम्ही म्हणतो, ‘कामगारांनी जग एकत्र केले आहे.’ हा शब्दातला एक छोटासा बदल वाटत असला तरी हा एक प्रचंड वैचारिक बदल आहे. RSS मधून येणारे स्वयंसेवक अशा उपक्रमांना बळ देतात आणि प्रोत्साहन देतात. जेव्हा तुम्ही या उपक्रमांवर नजर टाकाल तेव्हा तुम्हाला दिसेल की गेल्या 100 वर्षात RSS ने भारताच्या चकाचकतेपासून दूर राहून साधकाप्रमाणे समर्पणाने काम केले आहे. अशा पवित्र संस्थेतून मला जीवनमूल्ये आणि संस्कार मिळाले, हे माझे भाग्य आहे, अशी भावना पीएम मोदींनी यावेळी व्यक्त केली.

संघाने आदिवासी भागात 70 हजार शाळा उभारल्या
पीएम मोदी पुढे म्हणतात, संघाने पालनपोषण केलेले काही स्वयंसेवक वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजाची सेवा करण्यासाठी समर्पित आहेत. ते आदिवासींमध्ये राहतात आणि त्यांच्या कल्याणासाठी काम करतात. त्यांनी दुर्गम आदिवासी भागात 70,000 हून अधिक शाळा उघडल्या आहेत. अमेरिकेतही असे काही लोक आहेत, जे त्यांच्यासाठी 10 किंवा 15 डॉलर्स दान करतात. काही स्वयंसेवकांनी शिक्षणात क्रांती करण्यासाठी विद्या भारतीची स्थापना केली आहे. आज ते सुमारे 25,000 शाळा चालवतात, सुमारे 30 लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देतात आणि मला विश्वास आहे की, या उपक्रमामुळे कोट्यावधी विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. शिक्षणासोबतच मूल्यांनाही प्राधान्य दिले जाते आणि विद्यार्थी समाजावर ओझे बनू नयेत, यासाठी त्यांनी डाउन टू अर्थ राहून कौशल्ये शिकावली जातात. म्हणजेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मग ती महिला असो, तरुण असो किंवा मजूर असो, RSS ने भूमिका बजावली आहे

स्वामी विवेकानंद यांचा खोलवर प्रभाव
लहानपण ग्रंथालयात जाण्याची आठवण त्यांनी जागवली. त्यावेळी आपण स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांच्याविषयी वाचन केल्याचे ते म्हणाले. त्यांच्या विचारांचा मोठा खोलवर परिणाम आपल्यावर झाल्याचे ते म्हणाले. मनुष्याला खरं समाधान वैयक्तिक लाभापेक्षा दुसऱ्याला केलेल्या निस्वार्थ सेवेतून मिळते हे विवेकानंद यांच्यामुळे कळाल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी स्वामी विवेकानंद आणि त्यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांच्याशीसंबंधीत एक घटना यावेळी सांगितली. विवेकानंद यांची आई आजारी पडल्याने त्यांनी गुरूकडे मदत मागितली. त्यावेळी रामकृष्ण यांनी त्यांना कालीमातेकडे प्रार्थना करण्यास सांगितले. काली मातेकडे प्रार्थना केली. त्यावेळी ते काहीच मागू शकले नाही. या परमशक्तीने अगोदरच इतके दिले आहे, तिच्याकडे अजून काय मागणार असा अनुभव त्यांना झाला आणि मानव सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचा बोध विवेकानंदांना झाल्याचे कथन मोदी यांनी केले.

पंतप्रधान मोदींचे बालपण आणि कौटुंबिक जीवन
बालपणीच्या आठवणी (PM Modi’s childhood memories) सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले की त्यांचे कुटुंब एका छोट्या घरात राहत होते जिथे “खिडक्या नव्हत्या, फक्त एक छोटासा दरवाजा होता.” ते म्हणाले की त्यांचे सुरुवातीचे आयुष्य गरिबीत गेले, परंतु कुटुंबाने कधीही ते ओझे मानले नाही. त्यांनी सांगितले की त्यांचा जन्म गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर येथे झाला, जे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यांनीआपले सुरुवातीचे शिक्षण तिथेच पूर्ण केले आणि आज, ते जगाला समजून घेत असताना, त्यांच्या बालपणीच्या आठवणी त्यांना प्रेरणा देतात.

(हेही वाचा – Fire : मध्य प्रदेशातील रुग्णालयात भीषण आग; १९० हून अधिक रुग्णांची सुटका)

कुटुंबाचे कठोर परिश्रम आणि शिस्त
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पालकांच्या कठोर परिश्रम आणि शिस्तीची आठवण करून दिली आणि म्हणाले, “आमच्या आईने खूप कष्ट केले. माझे वडीलही खूप शिस्तप्रिय होते. ते दररोज सकाळी ४:०० किंवा ४:३० वाजता घरातून निघायचे, मंदिरांना भेट द्यायचे आणि नंतर त्यांच्या दुकानात कामावर जायचे.” अशी आमची थोडक्यात दिनचर्या होती.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.