कर्नाटकातील बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चांगलेच बदनाम झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याचा फायदा उठविण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांत पंतप्रधान मोदी हे रविवारी, १२ मार्च रोजी पाचव्यांदा राज्याच्या दौऱ्यावर येत असून, विविध विकास कामांचा पायाभरणी समारंभ किंवा उद्घाटने त्यांच्या हस्ते पार पडतील.
कर्नाटकताली सत्ता कायम राखण्यावर भाजपने भर दिला आहे. कर्नाटकात गेले काही वर्षे प्रत्येक निवडणुकीनंतर सत्ताबदल होतो. २०१८ मध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तरी काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने एकत्र येऊन सरकार स्थापन केले होते. पण हे सरकार काँग्रेस व जनता दलातील आमदार फुटल्याने कोसळले होते. येडियुरप्पा यांना बदलून बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रिपदी संधी देण्याचा भाजप नेतृत्वाचा प्रयत्न फारसा यशस्वी झालेला दिसत नाही. कारण भाजपचे जुने नेते बोम्मई यांना साथ देत नाहीत. त्यातच पक्षांतर्गत हेवेदावे मोठ्या प्रमाणावर आहेत. पुन्हा सत्ता मिळाल्यास बोम्मई हे मुख्यमंत्रिपदी कायम राहणे काही नेत्यांना नको आहे.
(हेही वाचा हसन मुश्रीफ यांच्या घरावरील ईडीच्या धाडीनंतर समन्स)