देशात सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी, ५ मेला बेल्लारी येथे प्रचार करण्यासाठी पोहोचले होते. यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी ‘द केरळा स्टोअरी’ (The Kerala Story) चित्रपटाचा उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘दहशतवादी कटावर आधारित ‘द केरळा स्टोअरी’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. असे म्हटले जाते की, केरळा स्टोअरी फक्त एका राज्यातील झालेल्या दहशतवादी कटावर आधारित आहे. देशातील ऐवढे सुंदर राज्य, जिथले लोकं खूप मेहनती आणि प्रतिभावान आहे, अशा केरळमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कटाचा खुलासा या चित्रपटातून करण्यात आला आहे. बॉम्ब, बंदूक आणि पिस्तुलचे आवाज तर ऐकू येतात, पण समाजाला आतून पोकळ करत असलेल्या दहशतवादी कटाचा आवाज येत नाही. न्यायालयानेही या दहशतवादी कटाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.’
(हेही वाचा – The kerala Story : विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्याला केरळ उच्च न्यायालयाने फटकारले; म्हणाले… )
‘दहशतवादी प्रवृत्तीशी काँग्रेस मागच्या दाराने करतेय राजकीय सौदेबाजी’
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘देशाचे दुर्दैव बघा की, काँग्रेस आज समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या या दहशतवादी प्रवृत्तीच्या पाठीशी उभी दिसत आहे. इतकेच नाही तर अशा दहशतवादी प्रवृत्ती असलेल्यांशी काँग्रेस मागच्या दाराने राजकीय सौदेबाजीही करत आहे. त्यामुळे कर्नाटकातील जनतेने काँग्रेसपासून सावध राहण्याची गरज आहे. हे लोक चित्रपटावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसला हे करताना पाहून मला आश्चर्य वाटत आहे. कर्नाटक राज्य देशातील नंबर-१ राज्य बनवण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेची सर्वात महत्त्वाची गरज आहे. कर्नाटक दहशतवादापासून मुक्त राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दहशतवादीविरोधात भाजप नेहमीच कठोर राहिला आहे. मात्र जेव्हा जेव्हा दहशतवादाविरुद्ध कारवाई होते, तेव्हा मात्र काँग्रेसच्या पोटात दुखत,’ असा टोला मोदींनी लगावला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community