सध्या देशात निवडणुकीच्या हालचाली (PM Narendra Modi) जोरात सुरू आहेत. सर्वत्र निवडणूक प्रचाराचा आवाज ऐकू येत आहे. केंद्रात तिसऱ्यांदा सत्ता काबीज करण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) मुस्लिम समाजाच्या लोकांची वेगळीच शैली पाहायला मिळाली आहे. अलीगंज हैदरी येथील मशिद ‘हर हर मोदी, घर घर मोदी’च्या घोषणांनी दुमदुमली. (PM Narendra Modi)
मशिदीच्या आत पंतप्रधान मोदींचे पोस्टर
अलीगंज हैदरी मशिदीत (Bhopal) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. त्याचप्रमाणे ‘मोदी है तो मुमकिन है’ (PM Narendra Modi) या घोषणा सुद्धा देण्यात आल्या. बोहरा समाजाने मशिदीच्या (Bhopal) आत पंतप्रधान मोदी यांचे पोस्टर दाखवले. भोपाळमधून (Bhopal) भाजप उमेदवार आलोक शर्मा यांच्या समर्थनार्थ बोहरा समाजाने पंतप्रधान मोदी (PM Naren dra Modi)यांच्यासाठी घोषणाबाजी केली. बोहरा समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन ‘अबकी बार ४०० पार’ची घोषणा सुद्धा दिली. आमिल जौहर अली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं भरभरुन कौतुक केलं. पंतप्रधान मोदी आणि भाजपाला यश मिळावं म्हणून प्रार्थनाही केली. (PM Narendra Modi)
बोहरा समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणारे मोदी पहिले पंतप्रधान
दाऊदी बोहरा हा मुस्लिमांमधील आर्थिकदृष्टया सर्वात श्रीमंत समाज आहे. भाजपासाठी नेहमीच या समाजाची भूमिका अनुकूल राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि बोहरा समाजामध्ये चांगलं नातं आहे. बोहरा समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणारे मोदी पहिले पंतप्रधान होते. या समुदायातील बहुतांश लोक व्यापारी आहेत. यांचा व्यावसायिक समाज पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) पाठिंबा देणारा समाज आहे. (PM Narendra Modi)
पंतप्रधान मोदी बोहरा समाजाला कधी भेटले ?
१. १४ सप्टेंबर २०१८ रोजी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) बोहरा समाजाच्या भाषणात सहभागी होण्यासाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथे पोहोचले होते. यावेळी पंतप्रधानांनी बोहरा समाजाचे खूप कौतुक केले होते आणि बोहरा समाजाशी आपले विशेष नाते असल्याचे सांगितले होते.
२. १० फेब्रुवारी २०२३ रोजी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) मुंबईत दाऊदी बोहरा समाजाच्या कार्यक्रमाला पोहोचले होते. यादरम्यान त्यांनी अल जामिया-तुस-सैफिया (सैफ अकादमी) च्या कॅम्पसचे उद्घाटन केले. त्यांनी स्वत:ला बोहरा कुटुंबातील सदस्य असल्याचेही सांगितले.
३. २४ जून २०२३ रोजी पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) इजिप्तमधील बोहरा समाजाच्या लोकांची भेट घेतली.
हे पहा –
Join Our WhatsApp Community