PM Narendra Modi : पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच मोदींनी केला वाराणसीमध्ये रोड शो

या महिन्याच्या मागील दोन दौऱ्यांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी दक्षिण पश्चिम बंगालमधील हुगळी, नादिया आणि उत्तर २४ परगणा यासारख्या विविध जिल्ह्यांना भेट दिली होती, जिथे टीएमसीची मजबूत पकड असल्याचे मानले जाते.

171
PM Narendra Modi : पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच मोदींनी केला वाराणसीमध्ये रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शनिवारी (९ मार्च) पश्चिम बंगालमधून थेट उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे पोहोचले. वाराणसीच्या जनतेने त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार घोषित झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा वाराणसीचा हा पहिला दौरा आहे. यावेळी मोदींनी रोड शो केला. तसेच नियोजित वेळापत्रकानुसार पंतप्रधान मोदी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला भेट देऊन पूजा करणार आहेत.

(हेही वाचा – Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील ‘हे’ दोन पक्ष NDA सोबत; भाजपाची ताकद वाढली)

पंतप्रधान मोदींचे एकाच दिवशी चार दौरे :

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) मिशन मोडमध्ये असल्याचे दिसते. शनिवारी त्यांचे वाराणसी येथे आगमन झाले असून, आजच्या दिवसातील त्यांचा हा चौथा दौरा आहे. पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी आसाममधून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आणि त्यानंतर अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालमधून प्रवास करून उत्तर प्रदेशातील त्यांच्या संसदीय मतदारसंघात पोहोचले. पंतप्रधान मोदी रविवारी (१० मार्च) सकाळी आझमगडला भेट देण्याची शक्यता आहे. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Drug Smuggling : डीएमकेचे माजी नेते जाफर सादिक अटकेत)

सिलीगुडी येथे ४५०० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन :

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या महिन्यात त्यांचा हा तिसरा पश्चिम बंगाल दौरा होता. त्यांनी सिलीगुडी येथे ४५०० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि भाजपच्या सभेला संबोधित केले. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Deep Cleaning : पाच वर्षांच्या तुलनेत यंदाच्या फेब्रुवारी महिन्‍यात सर्वाधिक स्वच्छ हवा)

पश्चिम बंगालमधील विविध जिल्ह्यांना भेट :

या महिन्याच्या मागील दोन दौऱ्यांमध्ये पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी दक्षिण पश्चिम बंगालमधील हुगळी, नादिया आणि उत्तर २४ परगणा यासारख्या विविध जिल्ह्यांना भेट दिली होती, जिथे टीएमसीची मजबूत पकड असल्याचे मानले जाते. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर पश्चिम बंगालमध्ये चांगली कामगिरी केली होती. (PM Narendra Modi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.