दरवर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन (World Health Day) साजरा केला जातो. जागतिक आरोग्य समस्यांकडे लक्ष वेधणे आणि लोकांना निरोगी जीवन जगण्याबद्दल जागरूक करणे, हे यामागील उद्दिष्ट आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “आरोग्यम् परमम् भाग्यम्” म्हणजे निरोगी राहणे हे मोठे भाग्य आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याद्वारे निरोगी जीवनाचा संदेश दिला. (World Health Day)
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘जागतिक आरोग्य दिनानिमित्त, आपण निरोगी जग निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करूया. आपले सरकार आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रित करत राहील आणि लोकांच्या कल्याणाच्या विविध पैलूंमध्ये गुंतवणूक करेल. चांगले आरोग्य हा प्रत्येक समृद्ध समाजाचा पाया आहे!’ (World Health Day)
On World Health Day, let us reaffirm our commitment to building a healthier world. Our Government will keep focusing on healthcare and invest in different aspects of people’s well-being. Good health is the foundation of every thriving society! pic.twitter.com/2XEpVmPza9
— Narendra Modi (@narendramodi) April 7, 2025
पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी लठ्ठपणाच्या वाढत्या समस्येबद्दल चिंता व्यक्त केली आणि लोकांना त्यांच्या जेवणात तेलाचा वापर १० टक्क्यांनी कमी करण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आणि भाग्य आहे असे वर्णन करताना ते म्हणाले, ‘जीवनशैलीतील बदलांमुळे भारतीयांच्या आरोग्यासमोर आव्हान निर्माण झाले आणि लठ्ठपणाची समस्या एक गंभीर धोका म्हणून उदयास आली आहे. (World Health Day)
हेही वाचा-Supreme Court च्या आवारात २६ झाडांच्या पुनर्रोपणाला दिल्ली उच्च न्यायालयाची मान्यता !
एका अहवालाचा हवाला देत पंतप्रधान म्हणाले की, २०५० पर्यंत भारतातील ४४ कोटींहून अधिक लोक लठ्ठपणाने ग्रस्त असतील. पंतप्रधान मोदींनी व्यायामाला जीवनशैलीचा एक भाग बनवण्यावरही भर दिला. (World Health Day)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community