पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी, २२ जुलै रोजी झालेल्या सातव्या रोजगार मेळाव्यात ७० हजारांहून अधिक तरुणांना जॉइनिंग लेटर दिले. देशातील २० हून अधिक राज्यांमध्ये ४४ ठिकाणी त्याचे आयोजन केले होते. पंतप्रधान मोदी सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सामील झाले. २२ ऑक्टोबर २०२२ रोजी पंतप्रधानांनी रोजगार मेळाव्याचा पहिला टप्पा सुरू केला. तेव्हा पीएम म्हणाले होते, २०२३ च्या अखेरीस देशातील तरुणांना १० लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे आमचे लक्ष्य आहे.
(हेही वाचा – जखम असताना साचलेल्या पावसाच्या पाण्यातून चाललात, तर दुर्लक्ष करू नका..)
पंतप्रधानांनी गेल्या ८ महिन्यांत ६ रोजगार मेळ्यांमध्ये ४ लाख ३३ हजारांहून अधिक लोकांना जॉइनिंग लेटर दिले आहे. देशभरातील निवडक तरुणांना महसूल विभाग, आर्थिक सेवा विभाग, पोस्ट विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, जल संसाधन विभाग, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि गृह मंत्रालयात नियुक्त्या मिळतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community