‘वंदे भारत’ ट्रेनमुळे महाराष्ट्रातील पर्यटन आणि तीर्थस्थळांचा विकास होणार; पंतप्रधान मोदींचा विश्वास

138

रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे, देशाला ९वी आणि १०वी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना आनंद होत आहे. आजचा दिवस भारतीय रेल्वेसाठी विशेषतः मुंबई आणि महाराष्ट्रासाठी आधुनिक कनेक्टिव्हिटीसाठी महत्वाचा आहे. ही ट्रेन मुंबई आणि पुणे सारख्या देशातील आर्थिक केंद्रांना जोडणार आहे. यातून महाविद्यालय, उद्योजक आणि शेतकऱ्यांची सुविधा होणार आहे. पर्यटन व्यवसाय  वाढणार आहे आणि तीर्थस्थळांचा विकास होणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. 

शुक्रवार, १० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून शिर्डी आणि सोलापूर या दोन ठिकाणी जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. या दोन ट्रेनमुळे साईबाबांचे दर्शन घेणे, रामकुंड यांचे दर्शन घेणे आता सोपे होणार आहे. सोलापुरात पंढरपुरातील विठ्ठल रखुमाई, अक्कलकोट येथील स्वामी समर्थ, आई तुळजाभवानीचे दर्शन घेणे सोपे होणार आहे. सह्याद्री घाटातून जाताना निसर्गाचा आनंद घेता येणार आहे. वंदे भारत ट्रेन आधुनिक भारताची प्रतिमा आहे. भारताच्या वेगाचे प्रतिबिंब आहे. आतापर्यंत १० वंदे भारत ट्रेन सुरु झाल्या आहेत, त्या १७ राज्यांत १०८ जिल्ह्यांना जोडत आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले. 

(हेही वाचा चिंचवडमध्ये मविआचे टेन्शन वाढले; कलाटे निवडणूक लढणार)

डबल इंजिन सरकारच्या डबल प्रयत्नाने राज्यातील कनेक्टिव्हीटी वाढेल

एक काळ होत खासदार पत्र लिहून आमच्या स्टेशनवर ट्रेन थांबवण्याची विनंती करायचे, आता देशातील खासदार आमच्याकडेही वंदे भारत चालवा, अशी विनंती करत आहेत. मुंबईत एलिव्हेटेड कॉरिडॉरचे लोकार्पण झाले. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम मुंबईतील लोकांची कनेक्टिव्हीटी वाढवणार आहे. २१व्या शतकातील भारतात सार्वजनिक वाहतुकीला सुधरवायला हवे, ज्यामुळे जनसामान्यांचे राहणीमान उंचावणार आहे. म्हणून आधुनिक ट्रेन चालवली जात आहे, मेट्रोचा विस्तार होत आहे, नवीन विमानतळ सुरु होत आहे. भारताने पाहिल्यांदा १० लाख कोटी केवळ पायाभूत सुविधेसाठी दिले आहेत . ही रक्कम ९ वर्षाच्या तुलनेत जास्त आहे. डबल इंजिन सरकारच्या डबल प्रयत्नाने राज्यातील कनेक्टिव्हीटी वाढेल. या प्रकल्पांमुळे उद्योग वाढतात गरिबांना रोजगार मिळतात. यावेळीच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मजबुती दिली आहे. नोकरदार किंवा छोट्या उद्योजकांना आनंदीत केले आहे. २०१४ आधी २ लाख कमावणाऱ्यावर कर लागायचा, आम्ही ७ लाख उत्पन्न करमुक्त केले आहे. त्यावर युपीए सरकार २० टक्के कर घ्यायचे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.