PM Narendra Modi : … आणि पंतप्रधान मोदी झाले भावूक

सध्या महाराष्ट्राचा जो गौरव वाढतो आहे तो महाराष्ट्राच्या जनतेमुळे आणि इथल्या प्रगतीशील सरकारमुळे. प्रभू रामाने आम्हाला नेहमी वचनपूर्तीची शिकवण दिली आहे. मला आज खूप आनंद होतो आहे.

205
PM Narendra Modi : नरेंद्र मोदी केरळमधून निवडणूक लढणार
PM Narendra Modi : नरेंद्र मोदी केरळमधून निवडणूक लढणार

आज म्हणजेच शुक्रावर १९ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सोलापूर दौऱ्यावर आहेत. या महिन्यातील मोदींचा हा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. त्यामुळे त्यांचा हा सोलापूर दौरा अधिक विशेष आहे. या दौऱ्यादरम्यान नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असंघटित (Solapur Ray Nagar Housing Society) कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते झाले. ३५० एकर परिसर, ८३४ इमारती , ३० हजार फ्लॅट्स ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : जगभरात मोदींच्या नावाला मान; देशात पुन्हा मोदीच येणार)

या योजनेचं उद्घाटन करताना ‘सोलापुरातील कामगारांना घरं मिळाली याचा मला आनंद झाला’ असे सांगताना मोदींना (PM Narendra Modi) अश्रू अनावर झाले.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
पक्या घरात राम ज्योती प्रज्वलीत –

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या पंढरपूरच्या विठ्ठलाला आणि सिद्धेश्वर यांना नमस्कार करत भाषणाची सुरुवात केली. यावेळी मोदी म्हणाले की; “२२ जानेवारीला प्रभू राम आपल्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. संतांच्या मार्गदर्शनानुसार मी विशेष व्रत करत आहे. माझ्या या व्रताची सुरुवात नाशिक येथून झाली. रामभक्तीच्या वातावरणात आज सोलापुरात एक लाखापेक्षा जास्त कुटुंबाचा गृह्प्रवेश होत आहे. याचा मला खूप आनंद होत आहे. मला आनंद आहे की हे आपल्या पक्या घरात राम ज्योती प्रज्वलीत करणार आहेत. तसेच, आपल्या घराची चावी देण्यासाठी मी स्वतः आलो आहे. आज मोदींनी एक गॅरंटी पूर्ण केली. मोदींची (PM Narendra Modi) गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी, असं मोदी म्हणाले.

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : उत्तर प्रदेशमधील कैद्यांनी बनविले ५१ हजार दिवे, ४० हजार ध्वज)

‘लहानपणी अशा घरात राहायला मिळालं असतं तर’ असं म्हणताना मोदी भावूक झाले. ते भाषणादरम्यान क्षणभर थांबले. त्यानंतर पुन्हा त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Narasayya Adam : नरसय्या आडम यांनी मागितली देवेंद्र फडणवीस यांची जाहीर माफी; सोलपुरात काय झाला गोंधळ)

प्रभू रामाने आम्हाला नेहमी वचनपूर्तीची शिकवण दिली –

सध्या महाराष्ट्राचा जो गौरव वाढतो आहे तो महाराष्ट्राच्या जनतेमुळे आणि इथल्या प्रगतीशील सरकारमुळे. प्रभू रामाने आम्हाला नेहमी वचनपूर्तीची शिकवण दिली आहे. मला आज खूप आनंद होतो आहे की सोलापूरमधल्या गरीबांसाठी आम्ही जो संकल्प केला होता तो आज पूर्ण झाला आहे. या योजने अंतर्गत आशियातील सर्वात मोठ्या सोसायटीचं लोकार्पण झालं आहे. मी हे सर्व पाहिलं तेव्हा वाटलं की मलाही लहानपणी अशा घरात राहता आलं असतं तर. पण आज माला खूप आनंद होत आहे. या योजनेमुळे हजारो कुटुंबांची स्वप्न पूर्ण झाली आहेत. त्यांचे आशीर्वाद मला मिळतील आणि ती माझी सर्वात मोठी पुंजी आहे. अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.