काल म्हणजेच शनिवार १६ मार्च रोजी निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली. त्यामुळे सध्या संपूर्ण देशात निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
(हेही वाचा – तुम्ही २०२९मध्ये अडकलात, मी तर २०४७ची तयारी करतोय; निवडणूक जाहीर होताच PM Narendra Modi यांचा आत्मविश्वास)
Addressing the #IndiaTodayConclave24. @IndiaToday https://t.co/8sxPCzgCKZ
— Narendra Modi (@narendramodi) March 16, 2024
काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) १६ मार्चरोजी इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीलाच आगामी निवडणुकीबाबत भाकीत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मोदी काय आहेत हे शोधण्यासाठी तुमची संपूर्ण टीम कामाला लावा. त्यांना ते शोधून काढू द्या. तुम्ही २०२९ मध्ये अडकला आहात मी तर २०४७ ची तयारी करत आहे”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी २०२४ नंतरच्या निवडणुकांबाबतही सकारात्मक भाष्य करून तेच पुढेही भाजपाचंच सरकार सत्तेत राहणार असल्याचं सूचक वक्तव्य केलं आहे.
(हेही वाचा – Nashik: घंटागाड्या, पथदीप, अतिक्रमण मुद्द्यांवरून उद्योजक आक्रमक; अधिकाऱ्यांना धरले धारेवर)
त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर #PhirEkBaarModiSarkar हा ट्रेंड वायरल होत आहे.
(हेही वाचा – Manoj Jarange : “..तर सरकारला धडा शिकवला जाईल”)
लोकसभेच्या एकूण ५४३ जागा :
लोकसभेच्या एकूण ५४३ जागा आहेत. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने ३०३ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने ५२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपप्रणित एनडीएला टक्कर देण्यासाठी काँग्रेस, आरजेडी आणि इतर पक्षांनी युती केली आहे. (PM Narendra Modi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community