PM Narendra Modi बागेश्वर धाममध्ये; बालाजींची पूजा केल्यानंतर कर्करोग रुग्णालयाची केली पायाभरणी

202

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मध्य प्रदेशच्या (PM Narendra Modi Madhya Pradesh Visit) दोन दिवसांच्या दौऱ्यावर छतरपूरला पोहोचले. त्यांनी बागेश्वर धाम (Bageshwar Dham) येथे बालाजीची पूजा केली आणि कर्करोग रुग्णालयाची पायाभरणी केली. यानंतर ते भोपाळला पोहोचतील आणि भाजप नेत्यांशीही बोलतील. पंतप्रधान सोमवारी जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेचे उद्घाटन करतील. मध्य प्रदेशनंतर ते बिहार आणि आसामलाही भेट देतील. रविवारी दुपारी पंतप्रधान मोदी छतरपूरला पोहोचले. बाबा बागेश्वर धाम ट्रस्टकडून येथे एक कर्करोग रुग्णालय बांधले जात आहे. २१८ कोटी रुपये खर्चाच्या या वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची पायाभरणी पंतप्रधान मोदींनी केली. यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितले की, कर्करोग रुग्णालयाचा एक वॉर्ड पंतप्रधान मोदींच्या आईच्या नावाने बांधला जाईल. (PM Narendra Modi)

कर्करोग रुग्णालयाची (Foundation laying of Bageshwar Dham Cancer Hospital) पायाभरणी केल्यानंतर, पंतप्रधान भोपाळला रवाना होतील. पहिल्यांदाच ते भोपाळमधील राजभवनात रात्री मुक्काम करतील. सोमवारी सकाळी जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेचे उद्घाटन (Global Investor Summit) केल्यानंतर ते आसामला रवाना होतील.

(हेही वाचा – Budget Session : राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३ मार्चपासून मुंबईत सुरु होणार)

मध्य प्रदेशातील खासदार-आमदारांसोबत बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी खजुराहो विमानतळावरून (Khajuraho Airport) भोपाळला रवाना होतील. संध्याकाळी ते भाजप खासदार, आमदार आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संवाद साधतील आणि संघटनात्मक बैठकही घेतील. ते राजभवनात रात्री मुक्काम करतील. सोमवारी सकाळी पंतप्रधान भोपाळमध्ये दोन दिवसांच्या जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेचे उद्घाटन करतील,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पंतप्रधान मोदी रविवारी संध्याकाळी भोपाळमधील कुशाभाऊ आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मध्य प्रदेशातील खासदार आणि आमदारांशी चर्चा करतील.

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.