PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी नागपुरात दाखल ; शहरात ‘एक है तो सेफ हैं’ च्या बॅनर्सची चर्चा

58
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी नागपुरात दाखल ; शहरात 'एक है तो सेफ हैं' च्या बॅनर्सची चर्चा
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी नागपुरात दाखल ; शहरात 'एक है तो सेफ हैं' च्या बॅनर्सची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शहरातील माधव नेत्रालयमधील नव्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. सोबतच पंतप्रधान नागपुरातील रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात भेट देणार आहे. त्यावेळी संघाचे विद्यमान सरसंचालक डॉ. मोहन भागवत हेही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. संघाचे शताब्दी वर्ष सुरु असताना पंतप्रधानाच्या या दौर्‍याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. (PM Narendra Modi)

हेही वाचा-Gudhi Padwa 2025 : महाराष्ट्रातील पहिली गुढी तुळजाभवानी मातेच्या कळसावर उभारली !

नागपुरातील हिंसाचारच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज नागपूर दौरा होत आहे. परिणामी प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त तैनात करत जोरदार तयारी केली आहे. अशातच शहरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंतप्रधानांचा स्वागत करणारे होर्डिंग नागपूर शहर आणि ग्रामीण भाजपकडून मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले आहे. त्यापैकी बहुतांशी होर्डिंग वर ‘एक है तो सेफ है’ ही घोषणा दिसून येत असून या बॅनर्सची सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे. (PM Narendra Modi)

हेही वाचा- “विकासाची महागुढी उभारू या…” ; CM Devendra Fadnavis यांच्याकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “एक है तो सेफ है” ही घोषणा दिली होती आणि ती प्रचंड गाजली ही होती. विधानसभा निवडणुका पार पडून भाजप प्रचंड बहुमताने महाराष्ट्रात सत्तेत आलं. त्यानंतर आज (30 मार्च) जेव्हा पंतप्रधान नागपूर दौऱ्यावर येत आहेत, संघस्थानी जात आहेत, तेव्हा पंतप्रधानांनी दिलेली “एक है तो सेफ है” ची घोषणा रेशीमबाग परिसरातील प्रत्येक बॅनर आणि होर्डिंग वर प्रकर्षणाने दिसून येत आहे. (PM Narendra Modi)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.