PM Narendra Modi : तिसऱ्या टर्ममध्ये भारत टॉप ३ अर्थव्यवस्था बनणार

पंतप्रधान मोदींनी सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला. गेल्या १० वर्षांत भारत १० व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकाची आर्थशक्ती बनला आहे. आता मोदीने, आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील टॉप ३ इकोनॉमी मध्ये सहभागी होईल, अशी गॅरंटी देशाला दिली आहे.

206
PM Narendra Modi : तिसऱ्या टर्ममध्ये भारत टॉप ३ अर्थव्यवस्था बनणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज म्हणजेच रविवार १७ डिसेंबर रोजी सूरत विमानतळाच्या नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचे आणि सूरत डायमंड एक्सचेन्जचे अर्थात सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी तिसऱ्या टर्ममध्ये भारत टॉप ३ अर्थव्यवस्था बनणार असे आश्वासन दिले.

नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

सामान्य नागरिकांच्या मनात गॅरंटी म्हणताच नीती, नियत, नेतृत्व आणि काम करण्याचा ट्रॅक रेकॉर्ड या गोष्टी मनात येतात. नुकताच आम्ही तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन केले आहे. तेलंगणामध्ये भाजपच्या मतात विक्रमी वाढ झाली. यावरून २०२४च्या निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय नोंदवणार असल्याचे दिसून येते, असेही नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – Metro Accident : मेट्रो च्या दरवाजात साडी अडकली, अन् घडली दुर्दैवी घटना, नेमके काय घडले )

तिसऱ्या टर्ममध्ये भारत टॉप ३ अर्थव्यवस्था बनणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुढे म्हणाले की, ‘आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, गेल्या १० वर्षांत भारत १०व्या क्रमांकावरून ५व्या क्रमांकाची अर्थशक्ती बनला आहे. आता मोदीने, आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील टॉप ३ इकोनॉमीमध्ये सहभागी होईल, अशी गॅरंटी देशाला दिली आहे. आज आंतरराष्ट्रीय पातळीवरचे वातावरण भारताच्या बाजूने आहे. जगात भारताची चर्चा होत आहे. मेड इन इंडिया आता एक मजबूत ब्रॅंड बनला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.